महाराष्ट्र जि. प., पं. स सदस्य असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी संतोष दसवडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:10 IST2021-03-16T04:10:42+5:302021-03-16T04:10:42+5:30

तालुक्यातील विंझर येथील संतोष बबन दसवडकर यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल यांनी निवडीचे पत्र नुकतेच दिले ...

Maharashtra Dist. W., Pt. Santosh Daswadkar as the working president of the members' association | महाराष्ट्र जि. प., पं. स सदस्य असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी संतोष दसवडकर

महाराष्ट्र जि. प., पं. स सदस्य असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी संतोष दसवडकर

तालुक्यातील विंझर येथील संतोष बबन दसवडकर यांची निवड झाली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल यांनी निवडीचे पत्र नुकतेच दिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रात दोनच पंचायत समिती सदस्य निवडुन आले होते, वेल्हे

पंचायत समितीच्या सदस्यपदी संतोष दसवडकर निवडून आले होते.पंचायत समितीच्या

चार सदस्यांपैकी दोन सदस्य हे मनसेचे होते.पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी भरीव

अशी कामगिरी केली होती. पुणे येथे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत वेल्हे तालुक्यातील विंझर येथील संतोष दसवडकर यांची

महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी

बिनविरोध निवड करण्यात आली.या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल,सरचिटणीस कैलास

गोरे पाटील,राम जगदाळे,प्रदेश अध्यक्षा अमृता पवार,राज्य संघटक दिनकर पाटील,राज्य उपाध्यक्ष

सुभाष पवार,शिवाजी मोरे,निवृत्ती बोडके,विनोद तराब्द,रेखा कंटे,दमयंती जाधव,रुपाली माळेकर,रवींद्र चांगले,

मंदा कोल्हे उपस्थित होते.

पुणे - संतोष दसवडकर यांना निवडीचे पत्र देताना राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल व इतर.

Web Title: Maharashtra Dist. W., Pt. Santosh Daswadkar as the working president of the members' association