शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Budget 2021: राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं ? जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 16:16 IST

कोरोना संकटानंतरच्या पहिल्या अधिवेशनात जनतेला नेमका कसा दिलासा मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.

पुणे : कोरोनाकाळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशावेळी अर्थसंकल्पात मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.तसेच कोरोना संकटानंतरच्या पहिल्या अधिवेशनात जनतेला नेमका कसा दिलासा मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. मात्र, विधानसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात पुणे शहराला नेमकं काय मिळाले आहेत ते जाणून घेऊयात.  

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी २ वाजता विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ठाकरे सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी पवार यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधीमंडळात येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादनही केलं. या अर्थसंकल्पात आरोग्य विभाग, कृषी, महिला,एसटी, रेल्वे, जलसंपदा विभाग, एमपीएससी, धरणे, महामार्ग, यांसह विविध प्रकल्पांबाबत मोठ्या घोषणा करतानाच अनेक योजना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात 3 लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्या नियमित वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी 4 वर्षासाठी 2 हजार कोटींची घोषणा केली आहे. तसेच राज्यात आरोग्य सेवांसाठी 7,500 कोटींची तरतूद आणि नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. तसेच कोरोनाकाळात राज्यातील अर्थव्यवस्थेला सांभाळण्याचे काम कृषी क्षेत्राने केले असेही त्यांनी सांगितले.  अर्थसंकल्पात पुण्याला काय मिळालं..?  १ - पुण्याच्या 8 पदरी रिंगरोडसाठी 24 हजार कोटी लागणार, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल. २ - पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर. ३ - ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी 28 कोटी रुपये मंजूर.४- पुण्यातील साखर संकुलात साखर संग्रहालय उभारणार५ - पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, जेजुरी,  नीरा नरसिंगपूर यांसह सात पुरातन मंदिरांचा विकास होणार 

६ - पिंपरी चिंचवड येथील मेट्रो प्रकल्पासाठी निधी 

टॅग्स :Puneपुणेbudget 2021बजेट 2021State Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे