'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार पुन्हा सुरु करावा : संभाजी ब्रिगेडची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 07:31 PM2020-01-06T19:31:57+5:302020-01-06T19:32:31+5:30

राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये हा पुरस्कार देणे बंद केले़. 

Maharashtra Bhushan Award to be restart by state government : Demand by Sambhaji Brigade | 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार पुन्हा सुरु करावा : संभाजी ब्रिगेडची मागणी

'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार पुन्हा सुरु करावा : संभाजी ब्रिगेडची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे 'महाराष्ट्र भुषण' पुरस्काराने महाराष्ट्राचा सन्मान वाढतो, अभिमान वाढतो

पुणे : 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' हा महाराष्ट्राचा सर्वोच्च व मानाचा सन्मान आहे. महाराष्ट्राची सर्वोच्च अस्मिता म्हणून या पुरस्कारकडे सन्मानाने पाहिले जाते. महाराष्ट्रातील सामाजिक, साहित्य, कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्य, तत्वज्ञान, पर्यावरण, समाज प्रबोधन... व ऐतिहासिक क्षेत्रात मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा या माध्यमातून सन्मान केला जातो.राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये हा पुरस्कार देणे बंद केले़. यावर्षापासून हा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यास सुरु करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे़. 
याबाबतचे पत्रक संभाजी ब्रिगेडचेपुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी काढले आहे़. २०२० पासून बहुजन समाजातील सुसंस्कृत व समाजाशी तसेच साहित्य, साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्य, तत्वज्ञान, पर्यावरण, समाज प्रबोधन आदी, सरकारच्या नियमाच्या अधीन राहून महाराष्ट्रातील व्यक्तींचा या वर्षापासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याची मागणी आहे.
सरकारने सप्तखंजेरीवादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज, साहित्यिक व संस्कृत पंडीत डॉ. आ.ह. साळुंखे, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, ह.भ. प. रामदास महाराज कैकाडी (पंढरपूर), बद्रीनाथ महाराज तनपुरे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार, इत्यादी बहुजन समाजातील व्यक्तींना हा सन्मान देण्यात यावा. त्यासाठी राज्य सरकारने तात्काळ 'तज्ञ' समिती स्थापन करावी अशी महाराष्ट्राच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. 'महाराष्ट्र भुषण' पुरस्काराने महाराष्ट्राचा सन्मान वाढतो, अभिमान वाढतो, तो तसाच अखंड महाराष्ट्रभर पुरस्कार रूपी सन्मानाने अजून वृद्धिंगत व्हावा अशी 'संभाजी ब्रिगेड'ची मागणी आहे. 

Web Title: Maharashtra Bhushan Award to be restart by state government : Demand by Sambhaji Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.