व्हायब्रंट गुजरातसारखे मॅग्नेटिक महाराष्ट्र आयोजित करावे;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
By राजू इनामदार | Updated: January 23, 2025 19:55 IST2025-01-23T19:54:11+5:302025-01-23T19:55:33+5:30
राज्याची आर्थिक अवस्था अतिशय बिकट आहे. वाढत्या कर्जामुळे सरकारकडून विकास प्रकल्प आणि भांडवली खर्चावरील खर्च कमी

व्हायब्रंट गुजरातसारखे मॅग्नेटिक महाराष्ट्र आयोजित करावे;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
पुणे: भारतीय कंपन्यांबरोबर दावोस इथे जाऊन करार करण्याऐवजी गुजरात राज्याने जसे व्हायब्रंट गुजरात आयोजित केले तसेच महाराष्ट्रात मॅग्नेटिंक महाराष्ट्र आयोजित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली. यातून राज्याची आर्थिक अवस्था सुधारण्यास मदत होईल असे मत पक्षाने व्यक्त केले आहे.
पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सुनील माने यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस मध्ये होत असलेल्या जागतिक अर्थ परिषदेसाठी गेले होते. तिथे त्यांना औद्योगिक करार केले, त्यात बहुसंख्य कंपन्या भारतीय कंपन्या आहेत. परदेशी कंपन्यांचे राज्यात येणे अपेक्षित आहे. व्हायब्रंट गुजरात ला चांगले यश मिळाले, त्यांच्याकडे परदेशी गुंतवणूक वाढली. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही मॅग्नेटिक महाराष्ट्र चे आयोजन केले तर त्याचा चांगला उपयोग होईल. पुणे शहरामध्येच ही परिषद व्हावी अशी मागणी माने यांनी केली.
राज्याची आर्थिक अवस्था अतिशय बिकट आहे. वाढत्या कर्जामुळे सरकारकडून विकास प्रकल्प आणि भांडवली खर्चावरील खर्च कमी करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने आर्थिक योजना जाहीर केल्या, त्यामुळे राज्याची सगळी आर्थिक घडी विस्कटली आहे असे खुद्द अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सांगितले आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र आयोजित करून यात चांगला बदल घडवता होऊ शकतो. त्यामुळे याचा विचार व्हावा असे मत माने यांनी व्यक्त केले आहे.