तीन वर्षीय बालकाच्या आतड्यात अडकलेला चुंबक काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:16 IST2025-06-29T14:12:54+5:302025-06-29T14:16:04+5:30

या बालकाने चुकून लहान चुंबक गिळल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला दि. २५ रोजी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Magnet stuck in the intestine of a three-year-old boy successfully removed | तीन वर्षीय बालकाच्या आतड्यात अडकलेला चुंबक काढण्यात यश

तीन वर्षीय बालकाच्या आतड्यात अडकलेला चुंबक काढण्यात यश

पुणे : तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या पोटात अडकलेला चुंबक एंडोस्कोपिक प्रक्रियेद्वारे काढण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे. कमीत कमी छेद असलेल्या उपचारामुळे पोटाची मोठी शस्त्रक्रिया टळली असून, बालकाच्या जीवाला धोका न होता त्याला सुरक्षितपणे रुग्णालयातून सोडण्यात आले.

या बालकाने चुकून लहान चुंबक गिळल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला दि. २५ रोजी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत चुंबक छोट्या आतड्याच्या मध्यभागी अडकल्याचे आढळून आले. चुंबकाच्या तीव्र धार असलेल्या किनार असल्यामुळे आतड्याच्या आतील पेशींना इजा होण्याचा मोठा धोका होता.

गॅस्ट्रोइंटेरोलॉजिस्ट डॉ. नरेंद्र चोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एंडोस्कोपीद्वारे एक विशेष स्नेअर उपकरण वापरून चुंबक बाहेर काढले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर बालकाचे २४ तास अन्नपाणी बंद ठेवून निरीक्षण करण्यात आले. छातीचा एक्स-रे व ओटीपोटाचा अल्ट्रासाऊंड तपासण्या करून शरीरात कोणतेही छिद्र किंवा दुखापत झाली नसल्याची खात्री केल्यानंतर द्रव व मऊ पदार्थ देत, तीन दिवसांत त्याला घरी पाठविण्यात आले.

Web Title: Magnet stuck in the intestine of a three-year-old boy successfully removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.