पुणे : गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आता केवळ ऑनलाईनच बुकींग करावे लागत असून सिलिंडरही घरपोच दिले जात आहे. शहर व जिल्ह्यात दररोज सुमारे सहा हजार सिलिंडरचे बुकींग होत असून सुमारे ५ हजार ८०० सिलिंडर पोच केले जात आहेत. त्यामुळे सिलिंडरसाठी रांगा लागल्या नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. घरगुती गॅसचा तुटवडा नाही. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठाच बंद केला आहे. परिणामी हॉटेल, रेस्टॉरंट अडचणीत आल्याचे ते म्हणाले.
गॅस सिलिंडरसाठी शहर व जिल्ह्यात रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. हे टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता घरगुती सिलिंडरची मागणी ऑनलाईन आणि वितरण आता केवळ घरपोच पद्धतीने करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर चार दिवसात गॅस सिलिंडर ग्राहकांच्या घरी पोच करण्यात येणार आहे. गॅस एजन्सी, गोदाम किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट सिलिंडर देण्यास बंदी घालण्यात आली आहे. कुठेही रांगा लावून गॅस सिलेंडर देऊ नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. गॅस एजन्सीसमोर गर्दी झाल्यास पोलिस प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण फक्त ओटीपीद्वारेच ९६ तासांच्या आत घरपोच करण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख असलेले फलक सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर लावावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दैनंदिन रिफिलिंगची क्षमता वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गॅस सिलिंडरची दररोजची मागणी आणि पुरवठ्याची माहिती जिल्हा प्रशासनास कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या निर्णयाची अंमलबाजवणी सुरू झाल्यानंतर मंगळवारी (दि. १७) रांगा दिसल्या नाहीत. शहर व जिल्ह्यात दिवसभरात ६ हजार सिलिंडरचे बुकींग केले जाते. त्यातील ५ हजार ८०० सिलिंडर घरपोच दिले जात आहेत. यावरून सिलिंडरचे वितरण सुरळीत असल्याचे दिसून येत आहे, असेही डुडी यांनी स्पष्ट केले. शहरासह जिल्ह्यात एकूण ३८ लाख २३ हजार गॅस जोड आहेत. एचपी, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या २२२ गॅस एजन्सींमार्फत वितरण केले जाते.
Web Summary : Pune ensures smooth LPG supply with online booking and home delivery. Six thousand cylinders are booked daily, with 5,800 delivered. Domestic gas is available, but commercial supply is restricted. OTP-based delivery within 96 hours is enforced.
Web Summary : पुणे ऑनलाइन बुकिंग और होम डिलीवरी के साथ एलपीजी की सुचारू आपूर्ति सुनिश्चित करता है। प्रतिदिन छह हजार सिलेंडर बुक किए जाते हैं, जिनमें से 5,800 वितरित किए जाते हैं। घरेलू गैस उपलब्ध है, लेकिन वाणिज्यिक आपूर्ति प्रतिबंधित है। 96 घंटों के भीतर ओटीपी-आधारित डिलीवरी लागू है।