LPG Gas Crisis : अफवांना बळी पडू नका; खेड तालुक्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:31 IST2026-03-14T13:30:22+5:302026-03-14T13:31:27+5:30

- खेड तालुक्यात सुमारे सव्वा लाख घरगुती गॅस ग्राहक असून तालुक्यात सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

LPG Gas Crisis Don't fall prey to rumors; Khed taluka has sufficient stock of domestic gas | LPG Gas Crisis : अफवांना बळी पडू नका; खेड तालुक्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा

LPG Gas Crisis : अफवांना बळी पडू नका; खेड तालुक्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा

राजगुरूनगर : सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत गॅसच्या दरवाढीचा प्रयत्न करणे, घरगुती गॅसचा व्यावसायिक किंवा अवैध वापर करणे तसेच सिलिंडरची साठेबाजी करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.

खेड तालुक्यात सुमारे सव्वा लाख घरगुती गॅस ग्राहक असून तालुक्यात सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडून गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सर्व ग्राहकांना वेळेवर आणि सुरळीत गॅस सिलिंडरचा पुरवठा व्हावा तसेच काळाबाजार किंवा साठेबाजी होऊ नये, यासाठी तहसीलदार प्रशांत बेंडसे यांनी कडक पावले उचलली आहेत. यासाठी विशेष पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे. एजन्सी चालकांनीही ग्राहकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

घरगुती गॅसचा अवैध वापर टाळावा तसेच कुठेही साठेबाजी किंवा निर्धारित दरापेक्षा जादा दराने सिलिंडर विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन तहसीलदार बेंडसे यांनी केले. निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे घेणाऱ्या वितरकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

Web Title : खेड में एलपीजी संकट नहीं; अफवाहों से बचें, पर्याप्त स्टॉक उपलब्ध

Web Summary : खेड तालुका में एलपीजी का पर्याप्त भंडार है; अफवाहों के कारण निवासी घबराएं नहीं। प्रशासन अवैध उपयोग, जमाखोरी और अधिक मूल्य निर्धारण के खिलाफ सतर्क है। नागरिकों से किसी भी उल्लंघन की रिपोर्ट करने का आग्रह किया जाता है। अपराधियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी।

Web Title : No LPG Crisis in Khed; Don't Panic, Sufficient Stock Available

Web Summary : Khed taluka has sufficient LPG stock; residents shouldn't panic due to rumors. The administration is vigilant against illegal usage, hoarding, and overpricing. Citizens are urged to report any violations. Strict action will be taken against offenders.