शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

भरतेय हुडहुडी; महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट, नाशिकला ११.७ अंश सेल्सिअसची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:17 PM

मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात पारा झपाट्याने खाली येवू लागला आहे. शुक्रवारी नाशिक येथे सर्वात कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ठळक मुद्देशुक्रवारी नाशिक येथे सर्वात कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदअनेक शहरांतील किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंशापर्यंत घट

पुणे : राज्यात मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, शुक्रवारी नाशिक येथे सर्वात कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ व मराठवाड्यातही किमान तापमानात उल्लेखनीय घट झाल्याने गारवा वाढला आहे.काही दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात घट होत चालली आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात पारा झपाट्याने खाली येवू लागला आहे. अनेक शहरांतील किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंशापर्यंत घट झाली आहे. सोलापूर शहराचे सरासरी तापमान ४.९ अंशांनी, तर अहमदनगरचे तापमान ४.५ अंशांनी खाली आले आहे. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. उस्मानाबादमध्ये शुक्रवारी १२.५ अंश तापमानाची नोंद झाली. शहराचा किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ५.४ अंशांनी उतरला. परभणी शहरातही थंडी वाढू लागली असून सरासरी तापमानात ४.३ अंशांनी घट झाली. विदर्भातील बहुतेक शहरांतील किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. 

प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई २४.२, रत्नागिरी २१.७, पुणे १३.४, अहमदनगर १२.५, जळगाव १३, कोल्हापूर १७.९, महाबळेश्वर १४.५, मालेगाव १४.८, नाशिक १६.४, सातारा १५, सांगली १६.४, सोलापूर १४.४, उस्मानाबाद १२.५, औरंगाबाद १४.६, परभणी १३.९, नांदेड १६, अकोला १६, गोंदिया १५, नागपूर १४.४.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र