शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलच्या शोधापेक्षा क्रमांकावर प्रेम अधिक

By admin | Updated: February 25, 2015 00:42 IST

दर दिवशी मोबाईल हरविल्या बाबतच्या किमान दोन तक्रारींची नोंद प्रत्येक पोलीस ठाण्यात होत आहे. तक्रारीनंतर मोबाईलऐवजी त्यातील त्याच

मंगेश पांडे, पिंपरीदर दिवशी मोबाईल हरविल्या बाबतच्या किमान दोन तक्रारींची नोंद प्रत्येक पोलीस ठाण्यात होत आहे. तक्रारीनंतर मोबाईलऐवजी त्यातील त्याच क्रमांकाचे दुसरे सिम कार्ड घेता यावे यासाठीच पोलिसांकडील तक्रारीची प्रत मिळविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. तक्रार करूनही हरविलेले मोबाईल सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सध्या मोबाईल फोनचा वापर वाढला आहे. मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणींची संख्या अधिक आहे. मात्र, मोबाईल हाताळताना आवश्यक ती दक्षता घेतली जात नाही. त्यामुळेच अनेकांचे मोबाईल चोरीला जातात, काहींंचे हरवितात. मोबाईल चोरीला गेला अथवा खरोखरच हरविला, तरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर त्याबाबत ‘प्रॉपर्टी मिसिंग’ अशी नोंद केली जाते. मोबाईल कंपनीचे नाव, मोबाईलचा आयएमईआय क्रमांक, त्यातील सिमकार्डचा क्रमांक याची नोंद केली जाते. त्यानंतर ठाण्यातील तपास अधिकारी याबाबतचा अहवाल परिमंडळ तीनच्या कार्यालयात पाठवितात. येथून हरविलेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक संबंधित मोबाईल कंपनीला कळविला जातो. त्यानंतर अन्य व्यक्तीने मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकल्यास ताबडतोब मोबाईल ज्या क्षेत्रात आहे, त्या स्थळाची (लोकेशन) कंपनीला माहिती मिळते. यासह त्यामध्ये कोणत्या क्रमांकाचे सिमकार्ड आहे याचीही माहिती उपलब्ध होते. यावरून मोबाईला शोध घेणे शक्य होते. मोबाईल बंद असल्यास अडचण निर्माण होते. तसेच त्याचा शोध घेणे कठीण होते. अनेकदा चोरलेल्या मोबाईलधील सिमकार्ड चोरटा काढून टाकतो. त्यामुळे ‘आयएमईआय’ क्रमांकाच्या आधारावरही शोध घेणे शक्य होत नाही. अनेकांना मोबाईलपेक्षाही त्यातील सिमकार्ड महत्त्वाचे असते. त्यामुळे मोबाईल हरविल्याबाबत ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याचा शोध लागला का, याबाबतची विचारणा करण्यासाठी संबंधित व्यक्ती ठाण्यात फेऱ्या मारत असते. मात्र, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे तक्रारदाराच्या पदरी निराशाच पडते. यामुळे अनेक तक्रारदार मोबाईल पुन्हा मिळण्याची आशाच सोडून देतात. परंतु नातेवाईक, व्यावसायिक यांच्यामध्ये प्रचलित असलेला मोबाईल क्रमांक मिळविण्याचा आग्रह असतो. पुन्हा त्याच क्रमांकाचे सिमकार्ड मिळवायचे असल्यास सिमकार्ड कंपनीला तक्रारीची प्रत देणे बंधनकारक असते.