पहलगाम हल्ल्यानंतर विमान कंपन्यांकडून लूटमार सुरु; श्रीनगर ते मुंबई १० वरून तब्बल २५ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:48 IST2025-04-23T19:47:39+5:302025-04-23T19:48:39+5:30
पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत

पहलगाम हल्ल्यानंतर विमान कंपन्यांकडून लूटमार सुरु; श्रीनगर ते मुंबई १० वरून तब्बल २५ हजारांवर
पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सर्वजण शहरांकडे येण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे विमान तिकीट बुक करणाऱ्यांची प्रमाण वाढले आहे. त्याचा गैरफायदा विमान कंपन्यांकडून घेतले जात असून, विमानांचे तिकीट तिप्पटीने महागले आहेत. त्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांना घरी येण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पहलगाव येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये अनेक २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. या घटनेनंतर जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सर्व पर्यटक घाबरले आहेत. सर्वांनी परतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, अचानक मोठ्या प्रमाणात तिकीटाची मागणी वाढली. त्यामुळे श्रीनगर ते मुंबई प्रवासासाठी ३० ते ३५ हजार रुपये तिकीट दाखविले जात आहे. इतर वेळी १० ते ११ हजार रुपये तिकीट असते. त्यामुळे पर्यटकांकडून सरकारकडे विमानांची सोय करून कमी तिकीटदर करण्याची मागणी केली जात आहे.
थेट विमानांची तकिटे महागली
श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत. कनेक्टिंग विमानांची तिकीट दर काही प्रमाणात कमी आहेत. पण, थेट विमानाचे तिकीट दर जास्त असल्याचे दिसून आले आहे. सरकारने देखील विमान कंपन्यांना तिकीट दर कमी करण्याची सूचना केली आहे.