धक्कादायक! गाईंना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन पळविण्याचा प्रकार CCTV कॅमेरात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 11:05 IST2021-09-04T11:04:06+5:302021-09-04T11:05:00+5:30

मावळमधील लोणावळ्यात रात्रीच्या वेळी गाई आणि वासरांना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

lonavla capturing cctv on the pretext of making cows unconscious | धक्कादायक! गाईंना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन पळविण्याचा प्रकार CCTV कॅमेरात कैद

धक्कादायक! गाईंना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन पळविण्याचा प्रकार CCTV कॅमेरात कैद

मावळमधील लोणावळ्यात रात्रीच्या वेळी गाई आणि वासरांना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणावळ्यातील ओळकाईवाडी येथे हा प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं आहे. 

भटक्या गाईंना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं जात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. अज्ञात तरुणांनी गाईला पाव खायला टाकले आणि भुलीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर चार चाकी वाहनांमध्ये गाईला भरुन नेण्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. संबंधित घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे. 

Web Title: lonavla capturing cctv on the pretext of making cows unconscious