शहरं
Join us  
Trending Stories
1
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
3
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
4
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
5
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
6
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
7
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
8
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
9
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
10
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
11
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
12
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
13
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
14
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
15
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
16
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
17
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
18
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
19
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
20
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election:बारामतीच्या नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 11:11 IST

- २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

बारामती – अवघ्या दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने बारामती नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह इतर सर्व ४१ नगरसेवकांच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे. ज्या-ज्या नगरपरिषदेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात संबंधित उमेदवारांनी दाद मागितली होती, मात्र २२ नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर न झालेल्या ठिकाणी निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये बारामती नगरपरिषद निवडणुकीचाही समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी हा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार यामध्ये नव्याने कोणालाही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.

नगराध्यक्षांसह प्रभाग ८-ब, ११-ब, १३-ब, १५-ब, १७- अ, १९-ब या प्रभागामध्ये प्रथम छाननी होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नव्याने मुदत मिळेल. उर्वरित प्रभागात काहीही बदल होणार नाही. नगराध्यक्षांसह वरील सहा प्रभागातील उमेदवारांना खर्चाची मुदत वाढवून मिळणार आहे. उर्वरित सदस्यांना ही मुदतवाढ मिळणार नाही. या सर्व सदस्यांना बिनाखर्च प्रचार संपण्याच्या कालावधीपर्यंत प्रचार करावा लागणार आहे. मात्र आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले असल्याने त्यांच्यावर कसलाही परिणाम होणार नाही; ते बिनविरोधच नगरसेवक राहणार आहेत. त्यांच्या प्रभागातील मतदार फक्त नगराध्यक्षांनाच मतदान करणार आहेत.

नगराध्यक्षांसह इतर सहा ठिकाणी नवीन निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल  : निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबरला जारी होईल. १० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच अंतिम यादी ११ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

नव्याने जाहीर झालेल्या निवडणूक प्रक्रियेमुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवार आणि राजकीय नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. दरम्यान, रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती शहरातील आयोजित सांगता सभा रद्द करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Municipal Election Postponed: State Election Commission Announces New Date

Web Summary : The Baramati municipal election is postponed to December 20th by the State Election Commission due to pending legal challenges. A revised schedule is issued, allowing withdrawal of nominations in specific wards. Ajit Pawar's rally is canceled.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक