बारामतीच्या ‘कृषक’मध्ये देशी काळा टोमॅटो ,काळी मिरची,८ फुटी भोपळा,रंगीत सुर्यफुल ठरले आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:53 IST2025-01-17T17:52:54+5:302025-01-17T17:53:46+5:30
कृषक मध्ये अमेरिका,जपान, नेदरलँड, जर्मनी,ब्राजील,थायलंड व तुरकस्थान या देशातील विविध शेती उपयुक्त तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या काैतुकाचा विषय ठरले

बारामतीच्या ‘कृषक’मध्ये देशी काळा टोमॅटो ,काळी मिरची,८ फुटी भोपळा,रंगीत सुर्यफुल ठरले आकर्षण
बारामती : बारामती येथे आयोजित अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषि विज्ञान केंद्राच्या 'कृषिक' हे जागतिक स्तरावरील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना नाविन्यपुर्ण आधुनिक शेतीसह देशी वाणाच्या लागवडीचे धडे मिळाले. यंदा 'एआय' तंत्रज्ञानाबरोबरच रंदेशी काळा टोमॅटो ,काळी मिरची,८ फुटी भोपळा,रंगीत सुर्यफुल लाल केळी, पाण्यावरील शेती, जपान जर्मनीच्या गजनिया,रुटबेकीया,जिनिया या शोभिवंत फुलांची शेती,रंगीत सुर्यफुल, एकाच खोडाला लगडलेले वांगी आणि टोमॅटो मोठे आकर्षण ठरले.
या मध्ये प्रामुख्याणे पॉलीहाउसमध्ये तसेच कमी खर्चातील शेडनेटहाऊसमध्ये रंगीत ठोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, चेरी टोमॅटो व परदेशी भाजीपाला पिकांची लागवड, कोकोपीट ग्रोबॅग मध्ये रंगीत ढोबळी मिरची, ४० फुट उंच टोमॅटो हे डच प्रकारच्या पॉलीहाउसमध्ये लागवड तसेच इंडियन पद्धतीच्या पॉलीहाउसमध्ये लाल मातीचा वापर करून नेसर्गिक वायूविजन हरितगृहामध्ये ढोबळी मिरची, आले, ब्ल्युबेरी, रासबेरी पिंकांचे घेतलेले उत्पादन, विविध परदेशी फळपिकांमधील चेरी, अवोकॅडो, सफरचंद, लीची,निळी व लाल केळी,पिच, पिअर,काळï कांदा,तैवान पेरू,थायलंड फणस,डाळिंब विविध वाण आणी जर्मनीतील ७० प्रकारचे विविध फुलांचे वाण व इतर फळपिके आणि फुलपिके, शेवंती फुलपिकाच्या २९ हुन अधिक वाणाची प्रात्यक्षिके व भाजीपाला पिके यांचे सुधारित वाण, टोमॅटो व भोपाळा याचे ३० हुन अधिक वाण आदी माहिती शेतकऱ्यांनी घेतली. तसेच ८ फुटी भोपळ्याच्या पिकाबरोबर सेल्फी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी कृषक मध्ये अमेरिका,जपान, नेदरलँड, जर्मनी,ब्राजील,थायलंड व तुरकस्थान या देशातील विविध शेती उपयुक्त तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या काैतुकाचा विषय ठरले. तसेच अॅक्वापोनिक्स तंत्रज्ञानाचे प्रयोग बघावयास मिळेल.
चिया, तुर्कस्थांची बाजरी, मिलेटचे जास्त उत्पन्न देणारे वाण निळे लाल केळी, विविध फळ पिके, रामभुतान, पिअर, पिच, प्लम, लिची, सफरचंद, अवाकाडो, ब्लुबेरी, रासबेरी, फुल पिके, चेरी, लाल फणस, रोजमेरी, थाईम, ऑरगॅनो, सेज, ॲस्परॅगस इ. पीक प्रात्याक्षिके पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. यंदा प्रथमच भविष्यातील डिजिटल शेती संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकासह अनुभवली. कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलवडे यांची शेतकऱ्यांनी भेट घेत याबाबत चर्चा केली.शेतकऱ्यांना कृत्रिम बुध्दिमतेच्या (एआय तंत्रज्ञान) वापरावर आधारित शेतकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली. यामध्ये या तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय आणि वापरासह घेतलेले ऊसाचे उत्पादन पाहून शेतकऱ्याच्या भुवया उंचावल्या.
विशेषत: शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे ऊसपिकाचे वजन आणि साखर उतारा या तंत्रज्ञानाच्या वापराने फायदेशीर होणार आहे. ब्रिमँटो म्हणजे एकाच खोडाला वांगे आणि दुसऱ्या फांदीवर टोमॅटो लगडल्याचे दिसून आले. एकाच पिकामध्ये एकाच पाण्यामध्ये दोन पिके घेण्याचा हा अफलातून प्रयोग आहे. या वर्षी नेदरलँड, चीन, अमेरिका, इस्त्राइल, ब्राझिल, स्पेन, इटली, जर्मनी, अफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरिया, जपान, इंग्लंड (यूके), मेक्सिको, स्विडेन, तुर्कस्थान, ऑस्ट्रेलिया इत्यादि देशांतील विविधएआय, सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान बियाणे खते, औषधे, मशीनरी, पॉलीहाउस, लागवड तंत्रज्ञान, स्मार्ट टुल्स शेतकऱ्यांनी अनुभवली. प्रदर्शनात एकच खोड आणि त्या खोडाला टोमॅटो आणि वांगी यांचे एकत्रित उत्पादन घेण्यात आले आहे. याला द्विपिक पद्धती म्हणतात. भारतीय बाजारपेठेतील लहरी शेतमालाच्या बाजारभावाचा प्रभाव लक्षात घेत एका पिकाने नुकसान केले तरी दुसऱ्या ठिकाणी हात द्यावा अशा अर्थानं ही दोन पीकं एकाच खोड्यावरती घेण्यात आली आहेत. जेणे करून एकाच पाण्यामध्ये दोन पिके पिकवून त्यांचे अखंड उत्पादन घेण्याचा प्रयोग आहे.