कुरकुंभ : कुरकुंभ (ता.दौंड) येथे रस्ता रुंदीकरणाच्या कामातील संथगतीमुळे वाहतकीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असताना याला कारणीभूत असणाºया यंत्रणा कुंभकर्णी झोपेतुन मात्र बाहेर येण्याचे नावच घेत नाही.गेली दोन वर्षांपासून या रस्त्यावरून जाणाºया प्रवाश्यांची व मालवाहतूक करणाºया वाहनांची जीवघेणी कसरत सुरू आहे. निर्ढावलेल्या कंत्राटदार व यंत्रणेकडे स्थानीक प्रशासनासह राजकीय नेतृत्वाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आता प्रत्येक स्तरातून होऊ लागला आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणाच्या व नूतनिकरणाच्या माध्यमातून ज्या त्या परिसरातील विकासाच्या गतीला चालना मिळावी व दळणवळण सहज सोपेपणाने करता यावे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवला जातो.केंद्र सरकारच्या माध्यमातुन ज्या रस्त्यांना महामागार्ची मंजुरी मिळाली आहे त्या रस्त्यावरून जाणाºया वाहनांची वर्दळ साहजीकच वाढताना आढळून येते मात्र दौंड तालुक्यातील परिस्थिती त्याला अपवाद आहे.कुरकुंभ येथील औद्योगीक क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने होणारी कामगारांची वाहतूक तसेच विविध प्रकारच्या अवजड वाहतुकीला यामुळे धोका निर्माण झाला आहे.
दौंड तालुक्यात मुख्यत्वे दौंड पाटस,कुरकुंभ दौंड व सिद्धटेक दौंड या रस्त्यांची अवस्था अतिशयखराब झालेली आहे.त्यामुळे या रस्त्याचा वापर जितका शक्य होईल तितका टाळण्याचा प्रयत्न वाहतुकदार व स्थानीक नागरिक करताना दिसून येतात. अतिशय गाजावाजा करून रस्त्यांच्या कामाला झालेली सुरवात नंतरच्या काळात अनेक अडचणीत सापडत गेली. खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व तत्सम अधिकाºयांच्या बैठकीत देखील यावर तोडगा निघाला नसल्याने अपुºया यंत्रणेच्या व ढिसाळ कारभाराच्या गुºहाळात सर्वसामान्य जनता मात्र पिरगळून गेली आहे.
* महामार्ग प्रशासनाकडे मागणी
रस्त्याच्या कामातील दिरंगाईबाबत अनेकवेळा विविध अधिकाºयांना पत्रव्यवहार केलेला आहे. कुरकुंभ मुख्य रस्त्यामध्ये असणारे दुभाजक, विजेचे खांब,पादचारी मार्ग, भूमिगत गटारे लवकर पूर्ण करून देण्याबाबत महामार्ग प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
- राहुल भोसले
सरपंच कुरकुंभ
फोटो ओळ : कुरकुंभ येथे अतिशयथोड्या थोडक्या कामाने पादचारी मार्ग करण्यात येत आहे.कुरकुंभ बाजारतळ येथील सुरू असलेले काम.
0४१२२0२0-दौंड-११
-----------------