स्थायी समितीच्या आठ जागांसाठी इच्छुकांचे ‘लॉबिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:21+5:302021-02-05T05:19:21+5:30
पालिकेत भाजपचे ९७, राष्ट्रवादी ४१, शिवसेना १०, काँग्रेस १०, मनसे २, एमआयएम १ नगरसेवक निवडून आलेले आहेत. समितीमधील सदस्यांची ...

स्थायी समितीच्या आठ जागांसाठी इच्छुकांचे ‘लॉबिंग’
पालिकेत भाजपचे ९७, राष्ट्रवादी ४१, शिवसेना १०, काँग्रेस १०, मनसे २, एमआयएम १ नगरसेवक निवडून आलेले आहेत. समितीमधील सदस्यांची एकूण संख्या १६ आहे. यामध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य आहे. त्यांतील आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल येत्या २८ फेब्रुवारीला संपत आहे. त्यात भाजपचे सहा सदस्य असून, त्यात रासने, सुनील कांबळे, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, बंडू ढोरे, हिमाली कांबळे यांचा समावेश आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र पठारे आणि अशोक कांबळे यांचा कार्यकाल संपणार आहे. या सदस्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सदस्यांची नियुक्ती १६ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे.