पतीला सोडून पत्नी ‘लिव्ह इन’मध्ये! पतीचा प्रियकरावर कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

By विवेक भुसे | Updated: July 17, 2023 16:26 IST2023-07-17T16:01:45+5:302023-07-17T16:26:13+5:30

तरुणाच्या डोक्यावर, कानावर, हातावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले

Live in with wife assaulted by husband with coyote Young seriously injured | पतीला सोडून पत्नी ‘लिव्ह इन’मध्ये! पतीचा प्रियकरावर कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

पतीला सोडून पत्नी ‘लिव्ह इन’मध्ये! पतीचा प्रियकरावर कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

पुणे: लग्न झाले असताना दुसऱ्याबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याच्या रागातून पतीने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत काळेपडळ येथे राहणार्या एका २६ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल संदीपान गायकवाड (वय ३४, रा. पांढरेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) आणि मयुर मारुती जाधव (वय १९) यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काळेपडळ रेल्वे गेटजवळील ओम साई व्हिडिओ गेम अँड पोकर झोन दुकानात शनिवारी रात्री दहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ओम साई व्हिडिओ गेम ॲन्ड पोकर झोन हे दुकान आहे. आरोपी यांची पत्नी फिर्यादी याच्याबरोबर गेल्या दीड वर्षांपासून काळेपडळ येथे रहात आहे. याचा अमोल गायकवाड याला राग होता. या रागातून तो शनिवारी रात्री काळेपडळला आला. त्याने ओळख पटू नये, म्हणून तोंडाला रुमाल बांधून डोक्यावर टोपी घातली होती. फिर्यादी हे दुकानात असताना त्याने आत प्रवेश केला. फिर्यादी याच्या डोक्यावर, कानावर, हातावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या तपासात अमोल गायकवाडबरोबर त्याचा आणखी एक साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. दोघांना पोलिसांनी भूम येथून अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Live in with wife assaulted by husband with coyote Young seriously injured