शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पुणे शहरच 'सील' केल्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास यश मिळणार; रूग्णांची वाढ मात्र दहा-पंधरा दिवस कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:22 IST

पुणे शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे दाटवस्तीच्या भागात म्हणजेच झोपडपट्टी भागात सापडले आहेत.

ठळक मुद्देरविवारी रात्रीपर्यंत पुणे महापालिका हद्दीत ६०० हून अधिक कोरोनाबाधित रूग्ण असल्याची नोंद चौदा दिवस या संशयितांना इतरांच्या संपर्कात न येऊ देता, संभाव्य संसर्ग टाळण्याचे नियोजन सुरू

निलेश राऊत-  

पुणे : कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने, आता संपूर्ण पुणे शहरच सील करून संचारबंदीची कडक अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यास मोठी मदत होणार असली तरी, पुढील दहा ते पंधरा दिवसात कोरोनाबाधितांच्या यापूर्वीच संपर्कात आलेल्या जवळच्या (क्लोज कॉन्टॅक्टमधील) व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मोठ्या प्रमाणात उजेडात येण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे शहर सील केल्यामुळे त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग रोखण्यास मोठे यश मिळणार आहे.

आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,तसेच परदेशातील कोरोना संसर्ग वाढीचा काळ लक्षात घेता, पूर्ण संचारबंदीत करण्यात येणाऱ्या विशेष आरोग्य तपासणीत कोरोनाची लागण झालेल्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. सद्यस्थितीला पुणे शहरात पालिकेच्या ८०० तपासणी पथकांकडून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य तपासणीचे काम केले जात असून, प्रामुख्याने ज्या भागात अधिक कोरोनाबाधित रूग्ण सापडले. त्या भागात ही तपासणी कसून करण्यात येत आहे. रविवारी रात्रीपर्यंत पुणे महापालिका हद्दीत ६०० हून अधिक कोरोनाबाधित रूग्ण असल्याची नोंद आहे. त्यामुळे या बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची संख्या ही मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुणे शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे दाटवस्तीच्या भागात म्हणजेच झोपडपट्टी भागात सापडले आहेत. त्यामुळे येथील रूग्णांच्या जवळच्या संपर्कातील (क्लोज कॉनटॅक्ट) व्यक्तींची संख्या मोठी असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची लक्षणे लागलीच आढळून येत नाहीत. किंबहुना कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले अनेक जण स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत नसल्याचे आढळून आले आहे. परिणामी प्रशासनाकडूनच आता ही तपासणीची कार्यवाही जोमाने होत असून, आजपर्यंत २५ लाख पुणेकरांची तपासणी करण्यात आली आहे.गेल्या दहा दिवसातील रूग्ण वाढीची संख्या व विभाग लक्षात घेता, शहर सील करण्याचा निर्णय हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठा आशेचा किरण आहे. सील केलेल्या भागातील संशयितांना लागलीच प्रशासनाकडून क्वारंटाईन कक्षात तसेच रूग्णालयांमध्ये खबरदारी म्हणून हलविण्यात येत आहे. तसेच चौदा दिवस या संशयितांना इतरांच्या संपर्कात न येऊ देता, संभाव्य संसर्ग टाळण्याचे नियोजन सुरू आहे.परिणामी कोरोना विषाणूच्या संसगार्ला आपण शहर सील करून अटकाव करीत असलो तरी, पुर्वी कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले व संसर्ग झालेले उजेडात येण्यास पुढील पंधरा दिवस तरी लागणार आहेत. यानंतर मात्र कोरोना संसर्गचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येण्यास सुरूवात होईल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे तसेच प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. या सर्वांला आता केवळ नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सोशल डिस्टसिंग ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामhospitalहॉस्पिटल