शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नुसताच गाजावाजा : पालिकेच्या बायोगॅसचे ‘दिवे’ पेटलेच नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 13:01 IST

बायोगॅस निर्मितीमधून प्रत्येकी १०० पथदिवे रोज लावले जातात असा दावा प्रशासनाने केला आहे. परंतू, विद्यूत विभागाच्या सूत्रांनी अद्याप एकही दिवा अशा प्रकारे लागला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देशहरामध्ये पालिकेने २५ बायोगॅस प्रकल्प केले होते सुरु..कोट्यवधींच्या खर्चाचा झाला चुराडा तब्बल १६ कोटी रुपये खर्च केल्यानंतर या प्रकल्पांवर आता देखभालीसाठी कोट्यवधी खर्च या प्रकल्पांमधून १२५ टन ओला कचरा जिरवून त्यामधून फायदा मिळवण्याचा उद्देश

पुणे : कचरा प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या बायोगॅसद्वारे वीज निर्मिती करुन पथदिवे ‘पेटविण्या’चा पालिकेचा उपक्रम प्रत्यक्षात उतरु शकला नाही. कोट्यवधी रुपये खर्च करुनही एकही दिवा पेटला नाही. त्यामुळे प्रशासनाने केलेला दावा खोटा ठरला असून विद्यूत विभाग आणि घनकचरा विभागामधील समन्वयाचा अभाव याला कारणीभूत ठरला आहे.  शहरामध्ये पालिकेने २५ बायोगॅस प्रकल्प सुरु केले होते. त्यातील २२ कार्यान्वित असून यामधून बायोगॅस निर्मितीमधून प्रत्येकी १०० पथदिवे रोज लावले जातात असा दावा प्रशासनाने केला आहे. परंतू, विद्यूत विभागाच्या सूत्रांनी अद्याप एकही दिवा अशा प्रकारे लागला नसल्याचे स्पष्ट केले आहे. शहरातील सर्व पथदिवे हे महावितरणच्या वीज प्रवाहामधूनच चालत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. पालिकेने १६ कोटी कोटी रुपये खर्च करुन बायोगॅसच्या माध्यमातून वीजनिर्मितीसाठी प्रकल्प उभारले. यातील बहुतांश प्रकल्पांना सध्या टाळे लागलेले आहेत. हे प्रकल्प उभारताना या प्रकल्पांमधून १२५ टन ओला कचरा जिरवून त्यामधून फायदा मिळवण्याचा उद्देश होता. या प्रकल्पांच्या देखभाल दुरूस्तीवर अडीच कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. दहा किलो ओल्या कचऱ्यापासून एक घनमीटर गॅस तयार होणे अपेक्षित आहे. १ जुलै २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत या सर्व २० प्रकल्पात कचऱ्यापासून केवळ २० टक्केच गॅस निर्मितीचे काम झाले आहे.====एक घन मीटर गॅसपासून १.२० युनिट्स वीज निर्माण होते. पाच टनांच्या २० प्रकल्पांमध्ये मिळून दरमहा ३ लाख ६० हजार युनिट्स वीज निर्मिती होणे अपेक्षित होते. यामधून पालिकेची दर महिन्याला २३ लाख अशी वर्षभरात पावणेतीन कोटी रुपयांच्या वीज बिलाची बचत झाली असती. प्रत्यक्षात केवळ १६ टक्केच वीजनिर्मिती झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रिया प्रकल्पातून निर्माण झालेली एक युनिट वीजही पथदिव्यांसाठी वापरली जात नसल्याचे विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.====तब्बल १६ कोटी रुपये खर्च केल्यानंतर या प्रकल्पांवर आता देखभालीसाठी कोट्यवधी खर्च करावे लागत आहेत. पांढरा हत्ती पोसण्याचा हा प्रकार असून प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले जात असल्याचे सांगणे हे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखे आहे. हे प्रकल्प फसले असून पालिका ते मान्य करणार नाही. - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका