शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणा-या बापाला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 9:06 PM

स्वत:च्या सात वर्षे सात महिन्याच्या मुलीवर बलात्कार तर सहा वर्षे सात महिन्याच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणा-या नराधम बापाला जन्मठेप आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

पुणे:  स्वत:च्या सात वर्षे सात महिन्याच्या मुलीवर बलात्कार तर सहा वर्षे सात महिन्याच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणा-या नराधम बापाला जन्मठेप आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. 

आरोपीच्या पत्नीने यासंबंधी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 13 जानेवारी 2015 आणि त्यापूर्वीच्या सहा महिन्यांच्या कालावधीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलाची साक्ष, वैद्यकिय पुरावा महत्त्वाचा ठरला. या प्रकरणाचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस.धुमाळ यांनी केला. त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक डी.एन.गवारे यांनी मदत केली. 

मुलगा आणि मुलीने आईला सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावेळी सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपी हा पीडितांचा नात्याने पिता आहे. दोन्ही मुलांचे संरक्षण करणे, त्यांना शिक्षण देणे आणि देशाचे चांगले नागरिक घडविणे ही त्याची जबाबदारी आहे. तरीही त्याने पोटच्या मुलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. ही अतिशय गंभीर घटना असून, आरोपी हा समाजासाठी घातक व्यक्ती असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. यावर सुनावणी करताना न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 376(2)(ष) (बलात्कार) नुसार जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंड, तर मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच वर्ष सक्तमजुरी आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.   

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे