प्रेमाला बंधन नाही..! पुण्यात पार पडला समलैंगिक जोडप्याचा विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:06 IST2025-06-17T18:00:33+5:302025-06-17T18:06:01+5:30

 हा विवाह थेट तीन दिवस चालला! पारंपरिक हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह विधी पार पडले. पहिल्या दिवशी दाक्षिणात्य हिंदू पद्धतीने मंगलाष्टकाच्या गजरात दोघं लग्नबंधनात अडकले

lgbtq community marriage Love has no boundaries Same-sex marriage takes place in Pune | प्रेमाला बंधन नाही..! पुण्यात पार पडला समलैंगिक जोडप्याचा विवाहसोहळा

प्रेमाला बंधन नाही..! पुण्यात पार पडला समलैंगिक जोडप्याचा विवाहसोहळा

-अश्विनी जाधव केदारी

पुणे -
  समाजाची समलैंगिकता या विषयाकडे पाहण्याची दृष्टी आता हळूहळू बदलतेय. प्रेम, नातं, आणि विश्वास यांना कोणतेही नियम लागू पडत नाहीत, हेच सिद्ध केलंय श्याम आणि राम या दोन समलैंगिक प्रेमवीरांनी..!

‘मिस्ट एलजीबीटीक्यू फाउंडेशन’चे सह-संस्थापक असलेले श्याम आणि राम यांनी आपल्या प्रेमाची सुंदर परिणती नुकतीच विवाहात केली. पुण्यात पार पडलेला त्यांचा विवाह सोहळा केवळ आगळा वेगळा नव्हता, तर तो एक सशक्त सामाजिक संदेशही होता, प्रेमाला आता स्वीकार मिळतोय, आणि ते आनंदाने साजरंही होतंय.

 हा विवाह थेट तीन दिवस चालला! पारंपरिक हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह विधी पार पडले. पहिल्या दिवशी दाक्षिणात्य हिंदू पद्धतीने मंगलाष्टकाच्या गजरात दोघं लग्नबंधनात अडकले, तर संध्याकाळी चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा एकदा “I do” म्हणत त्यांनी एकमेकांची साथ स्वीकारली.

हळदी, मेहंदी, संगीत – सगळे सोहळे रंगले… आणि ढोल-ताशांच्या निनादात एलजीबीटीक्यू समुदायासह मित्र, कुटुंब आणि समर्थकांनी आनंदाच्या जल्लोषात या प्रेमाच्या उत्सवाला साजरं केलं.

Web Title: lgbtq community marriage Love has no boundaries Same-sex marriage takes place in Pune