तुला मुलबाळ करुन दे! पतीच्या सांगण्यावरून मित्राचा मेसेज, धक्कादायक प्रकाराने पत्नीची पोलिसात धाव

By नितीश गोवंडे | Updated: March 28, 2025 16:06 IST2025-03-28T16:04:15+5:302025-03-28T16:06:06+5:30

पतीच्या मित्राला त्याने घरी आणल्यावर पत्नीचा विनयभंग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता

Let me give you a child Friend molests wife via text message on husband request | तुला मुलबाळ करुन दे! पतीच्या सांगण्यावरून मित्राचा मेसेज, धक्कादायक प्रकाराने पत्नीची पोलिसात धाव

तुला मुलबाळ करुन दे! पतीच्या सांगण्यावरून मित्राचा मेसेज, धक्कादायक प्रकाराने पत्नीची पोलिसात धाव

पुणे : स्वत:च्या पत्नीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी पती त्याच्या मित्राला घरी घेऊन आला. संबंधित आरोपी मित्राने देखील विवाहितेकडे एकटक बघत, तुझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन तुला मुलबाळ करुन दे, असे तुझा पती सांगत असल्याचा मेसेज करुन व फोन करुन विवाहितेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत एका २५ वर्षीय विवाहितेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तिचा पती (३०) आणि त्याच्या मित्र (५०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २१ जुलै २०२३ ते २ मार्च २०२५ दरम्यान सुरु होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता हिचा पती तिला शिवीगाळ करुन मारहाण करत असे. एके दिवशी तिचा पती फिर्यादीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी राहत्या घरी मित्राला घेऊन आला. त्यावेळी मित्राने फिर्यादीकडे एकटक पाहून तिच्या एकांताचा भंग करत विनयभंग केला. त्याला विवाहितेने विरोध केला. परंतु, कोणाकडे तक्रार केली नाही. त्या घटनेनंतरही तिच्या पतीचा मित्र सतत एसएमएस करुन फिर्यादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. फिर्यादीला फोन करुन तुझा पती तुझ्यासोबत सेक्स करु शकत नाही. तो मला तुझ्यासोबत सेक्स करुन तुला मुलबाळ करुन दे, असे तुझा पती सांगत असल्याचे बोलून तिचा विनयभंग करत होता. शेवटी या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलिसांकडे धाव घेत पती व त्याच्या मित्राविरोधात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तोंडे करत आहेत.

Web Title: Let me give you a child Friend molests wife via text message on husband request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.