Video: मोठ्या दगडावर ऐटीत बसलाय! आंबेगावात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांना काठ्या घेऊन फिरण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:57 IST2025-11-12T12:55:36+5:302025-11-12T12:57:23+5:30
एका वेळेला तीन ते चार महिलांनी एकत्र फिरावे सोबत काठ्या किंवा लोखंडी पाईप व मोबाईलवर गाणी लावून कामे करावी, वनविभागाचे आवाहन

Video: मोठ्या दगडावर ऐटीत बसलाय! आंबेगावात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांना काठ्या घेऊन फिरण्याचे आवाहन
अवसरी: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक हिंगे वस्ती पहाडदरा रस्त्यावर बिबट्या एका मोठ्या दगडावर ऐटीत बसला होता. आता या भागात बिबटयाचा मुक्त संचार होऊ लागला आहे. त्यामुळे घाटात पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
धामणी मार्गे पहाडदरा हे अंतर बारा ते पंधरा किलोमीटर अंतर दूरवरून आहे. तर पहाडदरा येथे दुसरा रस्ता अवसरी बुद्रुक हिंगेवस्ती पहाडदरा घाट मार्गे असून हे अंतर पाच ते सहा किलोमीटर आहे. जवळचे अंतर असल्याने पहाडदरा, लोणी, धामणी, शिरदाळे भागातील अनेक नागरिक, विद्यार्थी घाट मार्गे मंचर, अवसरी येथे ये जा करत असतात. तसेच हा भाग निसर्गरम्य परिसरात त्याने अनेक नागरिक या ठिकाणी फिरण्यासाठी देखील जात असतात. घाटात दोन फिल्म किलोमीटर संपूर्ण झाडे आहे. त्याचप्रमाणे घाटात पाण्याचे तळे असल्याने या घाटात बिबट्याचे सहज दर्शन स्थानिक ग्रामस्थ, वाहन चालकांना होत आहे.
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांना काठ्या घेऊन फिरण्याचे आवाहन #Pune#ambegaon#leopard#forestdepartmentpic.twitter.com/3yeBzq6xMi
— Lokmat (@lokmat) November 12, 2025
अवसरी बुद्रुक येथील सिद्धेश हिंगे पाटील व त्याचे दहा ते बारा मित्र पहाडदरा घाटातून जात असताना रात्री उशिरा एक बिबट्या मोठ्या ऐटीत मोठ्या दगडावर बसला होता. या बिबट्याचा फोटो सिद्धेश हिंगे पाटील यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. तर थोड्याच अंतरावर दुसऱ्या बिबट्या फिरतानाचा व्हिडिओ सुद्धा मोबाईल मध्ये काढण्यात आला आहे. पहाडदरा अवसरी गावातील तरुणांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे व आपला जीव धोक्यात घालू नये तसेच अवसरी बुद्रुक वाडी, वस्तीवर मोठ्या प्रमाणात बिबट्या दिवसा रात्री फिरताना दिसत आहेत. ज्येष्ठ नागरिक विशेषता महिलांनी शेतिकामे करताना काळजी घ्यावी एका वेळेला तीन ते चार महिलांनी एकत्र फिरावे सोबत काठ्या किंवा लोखंडी पाईप व मोबाईलवर गाणी लावून कामे करावी असे आवाहन मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी केले आहे.