शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

दिवळेत घरासमोर झोपलेल्या दोघांवर बिबट्याचा हल्ला ; दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:32 PM

काही महिन्यांपूर्वी याच गावात तीन बिबटे मृत अवस्थेत सापडले होते. यावेळी हे बिबटे येथे आलेच कसे असा प्रश्न उपस्थित झाला होता. वनविभागानेही या भागात बिबटे असणे अशक्य असेच वर्तवले होते.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी याच गावात तीन बिबटे मृत अवस्थेत सापडल्याने मोठी खळबळरुग्णालयात कुत्रे चावल्याचे निदान करून टिटचे इंजेक्शन

नसरापूर : पुणे - सातारा महामार्गालगत असलेल्या दिवळे गावात गुरूवारी रात्री घरासमोर झोपलेल्या दोघांवर बिबट्याने केलेल्या हल्ला केला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी याच गावात तीन बिबटे मृत अवस्थेत सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. किरण गोपाळ पांगारे (वय ३३), सुरेश जगताप (वय ५२, दोघे रा.दिवळे) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. किरण व  सुरेश हे गरमीचे दिवस असल्याने घरासमोर झोपले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झोपलेले असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्याने घरातील लोक जागे झाल्याने बिबट्या पसार झाला. या अगोदर बिबट्याकडून गाय, दोन वासरे व म्हैस यांना लक्ष करण्यात आले होते.  या हल्ल्यात किरण याला छाती,पाय व हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना भोर येथील उपजिल्हा रूग्णालय व सुरेश याला नसरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दोघांनाही पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी याच गावात तीन बिबटे मृत अवस्थेत सापडले होते. यावेळी हे बिबटे येथे आलेच कसे असा प्रश्न उपस्थित झाला होता. वनविभागानेही या भागात बिबटे असणे अशक्य असेच वर्तवले होते. मात्र, आजच्या घटनेमुळे आता बिबट्याने भोर तालुक्यातही मुक्काम ठोकल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाला बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.रुग्णालयात कुत्रे चावल्याचे निदान करून टिटचे इंजेक्शन जखमी अवस्थेत ग्रामस्थांनी किरण यांना भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचे म्हणणे ऐकून न घेता त्याला कुत्र्याने चावा घेतला असे परस्पर निदान करून त्यास टीटीचे इंजेक्शन देण्यात आले. व पुढील उपचारासाठी ससून येथे जा असे सूचवून त्याला बाकी कुठलेही उपचार केले नाहीत.यामुळे येथील भोंगळ कारभोर पुन्हा एकदा समोर आला आहे. 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्या