Video : बिबट्या आला रे आला ..! ऊसतोडणीनंतर ओतूर परिसरात बिबट्यांची वाढती हालचाल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:07 IST2026-03-06T15:07:17+5:302026-03-06T15:07:49+5:30

- काही नागरिकांनी बिबटे फिरताना दिसल्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Leopard Attack Leopards are here! Increased movement of leopards in Otur area after sugarcane cutting; Fear among citizens | Video : बिबट्या आला रे आला ..! ऊसतोडणीनंतर ओतूर परिसरात बिबट्यांची वाढती हालचाल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Video : बिबट्या आला रे आला ..! ऊसतोडणीनंतर ओतूर परिसरात बिबट्यांची वाढती हालचाल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ओतूर -  पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर व माळशेज परिसरात ऊसतोडणी पूर्ण झाल्यानंतर बिबट्यांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. ऊस शेती ही अनेक वर्षांपासून बिबट्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानली जात होती. मात्र ऊस कापणी झाल्यानंतर त्यांचे नैसर्गिक लपण्याचे ठिकाण कमी झाल्याने बिबटे आता गावाजवळ आणि शेत परिसरात दिसू लागले आहेत.



स्थानिकांच्या मते, ऊसतोडणी झाल्यानंतर बिबटे नेपियर गवत, मका शेती, ओढे, नदीकाठ आणि दाट झाडीचा आधार घेत फिरताना दिसत आहेत. त्यामुळे ओतूर परिसरातील अनेक गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओतूर परिसरातील गाढवेपट, आमदार मळा, तांबे मळा, अमीर घाट, कोळमळा आणि वाकमळा या भागांमध्ये दिवसा देखील बिबट्यांचे दर्शन होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. काही नागरिकांनी बिबटे फिरताना दिसल्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

घराच्या भिंतीवर बसलेला बिबट्या
आमदार मळा परिसरातील प्रवीण भांबुर्डेकर यांच्या घराच्या कंपाउंड भिंतीवर बुधवारी (४ मार्च) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या बसल्याचा व्हिडिओ स्थानिकांनी शूट केला. हा व्हिडिओ सध्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून नागरिकांमध्ये अधिकच चिंता वाढली आहे. तसेच गाढवेपट परिसरात शेतामध्ये दोन ते तीन बिबटे एकत्र फिरताना दिसल्याचेही काही व्हिडिओ समोर आले आहेत.

नागरिकांकडून वनविभागाकडे मागणी
या घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थ सतर्क झाले असून विशेषतः रात्रीच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी वनविभागाने तातडीने या परिस्थितीकडे लक्ष देऊन गस्त वाढवावी, तसेच योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.

Web Title : गन्ना कटाई के बाद ओतूर में तेंदुए दिखे; भय बढ़ा।

Web Summary : ओतूर में गन्ना कटाई के बाद तेंदुए की गतिविधि बढ़ने से दहशत है। तेंदुए गांवों के पास देखे जा रहे हैं, जो अपना घर खोने के बाद आश्रय ढूंढ रहे हैं। ग्रामीणों ने वन विभाग से कार्रवाई की मांग की।

Web Title : Leopard sightings increase in Otur after sugarcane harvest; fear rises.

Web Summary : After sugarcane cutting in Otur, leopard movement increased, causing panic. Leopards are seen near villages, seeking shelter after losing their habitat. Villagers demand forest department action.