शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

डुडुळगाव शाळेच्या पोषण आहारात अळ्या

By admin | Updated: August 2, 2014 04:19 IST

निकृष्ट दजार्चा आहार देणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे

भोसरी : महापालिकेच्या डुडुळगाव येथे असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये वाटप करण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आळ्या सापडल्याने खळबळ उडाली असून सातत्याने निकृष्ट दजार्चा आहार देणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.डुडुळगाव शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. आज दुपारी आहाराचे वाटप करीत असताना आहारामध्ये आळ्या असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले. तातडीने हा आहार देण्याचे थांबविण्यात आले. तर ज्या विद्यार्थ्यांना हा आहार वाटण्यात आला होता त्यांच्याकडून हा आहार तातडीने काढून घेण्यात आल्यामुळे अनर्थ टळला. याबाबत महिती देताना प्रभारी मुख्याद्यापक बाळू भांगे यांनी सांगितले की, सप्तशृंगी महिला स्वयंरोजगार या संस्थेच्या वतीने शाळेमध्ये पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. या संस्थेकडून गेल्या अनेक दिवसांपासून निकृष्ट दजार्चा आहार विद्यार्थ्यांना दिला जात आहे. याबाबत आपण पालिकेच्या शिक्षण मंडळाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली होती. ठेकेदार बदलण्याबाबतही लेखी पत्र दिले होते, मात्र कोणतीच कार्यवाही झाली नाही. या प्रकाराची माहिती शिक्षण मंडळाला देण्यात आली आहे. आज आहारामध्ये आळ्या सापडल्याने विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्येही अस्वस्थतेचे वातावरण असून उद्यापासून या ठेकेदाराकडून आम्ही शालेय पोषण आहार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शाळेसमोरच गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. या नागरिकांनी ठेकेदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याचे सांगितले. (वार्ताहर)