विधिज्ञ बाळकृष्ण मिडगे यांना एलएलडी आंतरराष्ट्रीय पदवी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 09:21 PM2018-02-12T21:21:56+5:302018-02-12T21:22:11+5:30

खेड तालुक्यातील ख्यातनाम विधिज्ञ व व्यवस्थापन सल्लागार ऍड. बाळासाहेब गोविंद मिडगे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले. या संशोधनाबद्दल ऍड मिडगे यांना प्रतिष्ठेची एलएलडी पदवी प्रदान करण्यात आली.

Lawmaker Balkrishna Midge LLD International degree | विधिज्ञ बाळकृष्ण मिडगे यांना एलएलडी आंतरराष्ट्रीय पदवी

विधिज्ञ बाळकृष्ण मिडगे यांना एलएलडी आंतरराष्ट्रीय पदवी

Next

 चाकण - खेड तालुक्यातील ख्यातनाम विधिज्ञ व व्यवस्थापन सल्लागार ऍड. बाळासाहेब गोविंद मिडगे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले. या संशोधनाबद्दल ऍड मिडगे यांना प्रतिष्ठेची एलएलडी पदवी प्रदान करण्यात आली.
 नुकत्याच मुंबई येथे ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, यु एस एस आर व श्रीलंका (येनेस्को) वतीने पार पडलेल्या जागतिक परिषदेत ऍडव्होकेट बाळकृष्ण मिडगे यांना एलएलडी पदवी देऊन गौरविण्यात आले. 'भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान, वेदांत व कायदा' या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. आपल्या संशोधनात भारतीय राज्यघटनेच्या तत्वज्ञानाचे वेदांत हे मूलभूत अधिष्ठान असून वेदांतावर राज्यघटनेचा अर्थ लावणे ही पाश्चात्य तत्वज्ञान व संस्कृतीने ग्रासलेल्या आजच्या समाजाची गरज असल्याचे ऍड मिडगे यांनी संशोधन केले आहे. "थेरी ऑफ कॉन्स्टिट्युशनल इंजिनिअरिंग" हा सिद्धांत त्यांनी आपल्या संशोधनात मांडला आहे.
 भारतीय तत्वज्ञान,संस्कृती व तिचा वारसा या आधारावर राज्यघटनेचा अर्थ लावण्यात आला तर मानवतावादी, कल्याणकारी राज्य व न्यायव्यवस्था विकसित होऊ शकते हे ऍड. डॉ. बाळकृष्ण मिडगे यांनी आपल्या संशोधनात पटवून दिले आहे. योग विषयातही त्यांनी काही सिद्धांत मांडले असून ते सिद्धांतही गाजले आहे. दरम्यान, ऍड मिडगे यांच्या यशाबद्दल त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Web Title: Lawmaker Balkrishna Midge LLD International degree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे