देर आए दुरुस्त आए...! राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यावर बारामतीत जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 18:22 IST2023-02-12T18:22:26+5:302023-02-12T18:22:39+5:30

नवनियुक्त राज्यपाल पूर्व राज्यपालांच्या पाऊलावर पाऊल न ठेवता महाराष्ट्राची अस्मिता व थोर महापुरुषांचा सन्मान ठेवतील

Late came corrected Jubilation in Baramati after Governor resignation was accepted | देर आए दुरुस्त आए...! राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यावर बारामतीत जल्लोष

देर आए दुरुस्त आए...! राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यावर बारामतीत जल्लोष

बारामती : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्या बद्दल धन्यवाद देत बारामतीत जल्लोष साजरा करण्यात आला. देर आए दुरुस्त आए.!! असं म्हणत उशिरा का होईना पण घेतलेल्या राजीनाम्याच्या निर्णयाबद्दल पेन्सिल चौक येथे बारामती शहर राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने पेढे वाटुन व फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी महाराष्टच्या नवीन राज्यपाल म्हणुन नियुक्त झालेले रमेश बैस शुभेच्छा देण्यात आल्या. नवनियुक्त राज्यपाल पूर्व राज्यपालांच्या पाऊलावर पाऊल न ठेवता महाराष्ट्राची अस्मिता व थोर महापुरुषांचा सन्मान ठेवतील. त्याबरोबर असंविधानिक गोष्टीचा पायंडा न पडता महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने पावलं उचलताल, अशी अपेक्षा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अविनाश बांदल,सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष अमोल कावळे ,शहर सोशल मीडिया अध्यक्ष तुषार लोखंडे तसेच युवक संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Late came corrected Jubilation in Baramati after Governor resignation was accepted