जमिन फसवणूक करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:09 IST2020-12-07T04:09:19+5:302020-12-07T04:09:19+5:30

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्रोली (ता.भोर) येथील गणेश रामचंद्र शेडगे यांना महाबळेश्वर येथे १० गुंठे जमीन असल्याचे संतोष जगदाळे ...

Land fraudster arrested | जमिन फसवणूक करणाऱ्यास अटक

जमिन फसवणूक करणाऱ्यास अटक

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्रोली (ता.भोर) येथील गणेश रामचंद्र शेडगे यांना महाबळेश्वर येथे १० गुंठे जमीन असल्याचे संतोष जगदाळे याने सांगून खोटा सातबारा दाखविला. जगदाळे याने टप्याटप्याने एक वर्षांपूर्वी ५० लाख रुपये घेऊन शेडगे यांना जमीन नावावर करून देतो असे सांगितले. मात्र, जमीन नावावर न करता जगदाळे मागील काही दिवसात फरार झाला होता. जगदाळे फसवाफसवी करू लागल्याने गणेश शेडगे यांनी भोर पोलिसात फिर्याद दिली. जगदाळे हा रत्नागिरी येथील सिद्धिविनायक अपार्टमेंट येथे भाड्याचे घर घेऊन राहत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार व पोलीस कॉन्स्टेबल अमोल मुरहे यांनी दोन होमगार्डसह तपास लावून रत्नागिरी येथे आरोपीस सापळा रचून अटक केली. तपसाअंती जगदाळे याने अशी अनेकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.

Web Title: Land fraudster arrested