शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड ताब्यात घेण्याचा फार्स

By admin | Updated: June 23, 2016 02:08 IST

नाणेकरवाडी, चाकण येथे एका कंपनीच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी शहरात आले होते. मुख्यमंत्री येणार असल्याचे कळताच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ओपन स्पेसचे

पिंपरी : नाणेकरवाडी, चाकण येथे एका कंपनीच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी शहरात आले होते. मुख्यमंत्री येणार असल्याचे कळताच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ओपन स्पेसचे (मोकळ्या जागेतील) भूखंड ताब्यात घेऊन कारवाईचा दिखावा केला आहे. आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी यांच्या सहभागाने ज्या भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले आहे, त्या भूखंडांवर कारवाई करण्यात आली नाही. एमआयडीसीच्या १२०० हेक्टर जमिनीपैकी १० टक्के खुले क्षेत्र (मोकळी जागा) आणि पाच टक्के सुविधा क्षेत्रासाठी आरक्षित जागा आहे. सुविधा क्षेत्राच्या या पाच टक्के जागेवर विविध आरक्षणे आहेत. ही आरक्षणे विकसित करण्यासाठी ६४ भूखंड पिंपरी-चिचंवड महापालिकेकडे हस्तांतरित करून वर्ग करण्यात आले. मात्र या ६४ भूखंडांपैकी ७० टक्के भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आले असून, हे भूखंड बळकावण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपयांचे हे भूखंड हडपणाऱ्यांमध्ये काही राजकीय पदाधिकारी, पिंपरी-चिंचवडमधील काही आजी-माजी नगरसेवक, शासकीय आणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. कोट्यवधींच्या या भूखंड घोटाळ्याची चौकशी करून यात सहभागी महापालिका आणि शासकीय अधिकाऱ्यांसह सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन भाजपाचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. ज्या उद्देशाने हे भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले होते, तो उद्देश साध्य झालेला नाही. चिंचवडच्या मोहननगर भागातील उद्यानासाठीच्या आरक्षित भूखंडावर बहुमजली पंचतारांकित हॉटेल उभारण्यात आले आहे. वाहनतळासाठी असाच एक भूखंड वापरात घेऊन त्यावर गृहप्रकल्प राबविण्यात आला. या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रारचाकण येथे एका कंपनीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शहरात आले होते. या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीचा दौरा केला. या वेळी एमआयडीसीचे अनेक अधिकारीही उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याची चौकशी व्हावी व दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (प्रतिनिधी)मोहननगर येथील एका भूखंडावर कारखान्याचे आरक्षण असतानाही तेथे इंटरनॅशनल महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. भूखंड हडपण्याच्या या प्रकारामुळे शहर विकास आराखड्याला सुरुंग लागला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड घोटाळा असून, यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींसह शासकीय आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांची कसून चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. तसेच बळकावण्यात आलेले हे भूखंड एमआयडीसीने पुन्हा ताब्यात घ्यावेत, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.कारवाईस पालिका अधिकारी गैरहजरभोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉकमधील ओएस ४३, ओएस ३७ व ओएस २७ असे तीन भूखंड महामंडळाकडून ताब्यात घेण्यात आले. आजूबाजूच्या उद्योजकांशी व स्थानिक लोकांशी चर्चा करून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी हे भूखंड ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये उपअभियंता, सहायक अभियंता व भूमापक यांचा सहभाग होता. भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांच्यापैकी कोणीच हजर झाले नाही.