घरफोडी करून ७२ हजारांच्या सोन्याच्या दोन बांगड्या केल्या लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 18:25 IST2021-03-20T18:25:03+5:302021-03-20T18:25:33+5:30

तीस ग्रॅमच्या दोन बांगड्या केल्या लंपास

Lampas made two gold bangles worth Rs 72,000 by burglary | घरफोडी करून ७२ हजारांच्या सोन्याच्या दोन बांगड्या केल्या लंपास

घरफोडी करून ७२ हजारांच्या सोन्याच्या दोन बांगड्या केल्या लंपास

ठळक मुद्देरुमच्या दरवाजाचे कुलूप हत्याराच्या साहाय्याने तोडले

पिंपरी : हत्याराच्या सहाय्याने कुलूप तोडून दरवाजा उघडत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून ७२ हजारांच्या ३० ग्रॅम सोन्याच्या दोन बांगड्या चोरटयांनी लंपास केल्या आहेत. येळवंडे वस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे गुरुवारी (दि. १८) दुपारी दीड ते रात्री साडे अकराच्या दरम्यान घरफोडीचा हा प्रकार घडला आहे. 
लवीना पुरुषोत्तमदास मानसिंगानी (वय २९, रा. हिंजवडी ) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १९) फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या रूमचा दरवाजा हा कडी-कोयंडा कुलूप लावून बंद होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रूमच्या दरवाज्याचे कुलूप हत्याराच्या सहाय्याने तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. ७२ हजार रुपये किमतीच्या ३० ग्रॅमच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरट्यांनी चोरून नेल्या.

Web Title: Lampas made two gold bangles worth Rs 72,000 by burglary