शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर

By admin | Updated: July 11, 2015 04:15 IST

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या १८५ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. १०) सकाळी सहाला लाखो वैष्णवांसह आजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला.

शेलपिंपळगाव : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या १८५ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. १०) सकाळी सहाला लाखो वैष्णवांसह आजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला. प्रस्थानापूर्वी रात्री एक वाजता माऊलींच्या पादुकांना रुद्राभिषेक करून पंचामृत पूजा, पंचपक्वान्न नैवेद्य, आरती, पसायदान घेण्यात आले.संपदा सोहळा नावडे मनाला !लागला टकळा पंढरीचा !!१!!जावे पंढरीशी आवड मनाशी !कधी एकादशी आषाढी !!२!!तुका म्हणे ऐसे आर्त ज्यांचे मनी !त्यांचे चक्रपाणी वाट पाहे !!३!!अशाच पद्धतीची भावना अलंकापुरीत दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांमध्ये दिसून येत होती. ज्ञानेश्वर महाराजांचा १८५ वा आषाढी पायीवारी पालखी प्रस्थान सोहळा लाखो वैष्णवांसह आजपासून पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाला. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता आजोळघरात विसावलेल्या या सोहळ्यात माऊलींच्या पादुकांचे लाखो वारकऱ्यांनी अगदी सहज व सुलभ दर्शन घेतले. प्रस्थान सोहळ्यादरम्यान बंद केलेली दर्शनरांग प्रस्थानानंतर मोठ्या गतीने दर्शनासाठी आत घेण्यात येत होती. माऊलींच्या दर्शनासाठी दिवसभर लांबच - लांब रांगा लागलेल्या असतानाही रात्री प्रस्थान सोहळ्यानंतर वाढत होत्या. धन्य आज संतदर्शनाचा !अनंत जन्मीचा शीण गेला !!मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे !कदा न सोडावे चरण त्यांचे!!या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकरी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी कासावीस होऊन त्यांच्या चरणावर माथा टेकून स्वत:ला धन्य करून घेत होता. संपूर्ण अलंकापुरी चैतन्यमय, धार्मिक वातावरणात दंग झाली होती. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माऊलींच्या पालखीला नैवेद्य दाखविण्यात आला. पावणेसहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व आजोळघरी आणून, गांधीवाड्यात त्यांना मानपान देण्यात आले. त्यानंतर माऊलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आली. वाजत-गाजत हा पालखी सोहळा पुढे धाकट्या पादुका व नंतर साई मंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावला. या ठिकाणी देवाची आरती घेण्यात आली. आरतीनंतर साडेनऊच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. नवमी व दशमीला हा सोहळा पुण्यात भवानी पेठ, तर एकादशीला सासवडनगरीत मुक्काम करणार आहे. दरम्यान, केंदूर (ता. शिरूर) येथील श्री संतश्रेष्ठ कान्होराज महाराजांची पालखी सकाळी सहाला पुण्याकडे मार्गस्थ झाली. (वार्ताहर)