महिलेवर अत्याचार करुन लाखो रुपयांना लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 14:02 IST2021-04-21T14:01:58+5:302021-04-21T14:02:41+5:30

त्रासाला कंटाळून शेवटी महिलेची पोलिसांकडे धाव

Lakhs of rupees were looted by torturing a woman | महिलेवर अत्याचार करुन लाखो रुपयांना लुबाडले

महिलेवर अत्याचार करुन लाखो रुपयांना लुबाडले

ठळक मुद्देशरीरसंबंधाचे फोटो काढून ते पती व सासरी दाखविण्यासाठी धमकी

पुणे: ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलेचे शरीरसंबंधाचे फोटो काढून ते पती व सासरी दाखविण्यासाठी धमकी देऊन एका दाम्पत्याने महिलेला लाखो रुपयांना लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खडक पोलिसांनी दाम्पत्यापैकी पतीला अटक केली आहे.  गणेश जगन्नाथ सोनावणे (रा. पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार २०१२ ते २०१९ पर्यंत सुरु होता. याप्रकरणी वारजे येथे राहणार्‍या एका ३२ वर्षाच्या महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.  

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि गणेश एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीचा गैरफायदा घेऊन गणेश सोनावणे याने पीएमसी कॉलनीतील घरी फिर्यादीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्या शरीरसंबंधाचे फोटो काढले. हे फोटो तिच्या पती व सासरी दाखविण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. तिच्याकडून ६ तोळ्याचे दागिने तसेच ५ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढून ती रक्कम स्वत: साठी वापरली. त्याच्या पत्नीने साडेतीन तोळ्याचा सोन्याचा हार घेऊन त्याचा अपहार केला. हे दागिने परत देण्याची मागणी केल्यावर त्यांनी शिवीगाळ केली़  या त्रासाला कंटाळून शेवटी या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

Web Title: Lakhs of rupees were looted by torturing a woman