शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:40 IST

संजीवन समाधीला अकरा ब्रम्हवृन्दांचा वेदघोषात पवमान अभिषेक, समाधीवर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला

आळंदी: श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशीला शनिवारी (दि.१५) मध्यरात्री बाराला सुरुवात झाली. संजीवन समाधीला अकरा ब्रम्हवृन्दांचा वेदघोषात पवमान अभिषेक, समाधीवर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. या विधिवत पूजेसमयी माऊलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसून येत होते. माऊलींना नैवद्य दाखवून सनई चौघड्याच्या तालात आरती घेण्यात आली.             महापूजेसाठी आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, डॉ.भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ऍड. रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, रामभाऊ चोपदार, मुख्याधिकारी माधव खांडेकर, पोलीस निरीक्षक भिमा नरके, अजित वडगावकर, डी. डी. भोसले, राहुल चव्हाण, ऍड. विष्णू तापकीर आदींसह आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते. 

बेरे दाम्पत्यांला मिळाला पूजेचा मान

 संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९ व्या संजीवन समाधीच्या महापूजेचा मान शंकर गणू बेरे व निर्मला शंकर बेरे (रा. सावरोली बुद्रुक ता. शहापूर) या वारकरी दांपत्याला मिळाला. महापूजेचा मान मिळाल्याने शंकर बेरे म्हणाले, आमच्यावर माऊलींची कृपा झाली. पाच तासांहून अधिक वेळ आम्ही दर्शनरांगेत उभे होते. आमचा व्यवसाय शेती आहे. मागील दोन वर्षांपासून कार्तिकी वारी करत आलो आहे. माऊलींची कृपा असल्याने हा योग घडून आला. सर्वांना सुखी ठेव असे मागणे माऊलींकडे मागितले आहे. देवस्थान विश्वस्तांच्या हस्ते नारळ - प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Lakhs of devotees visit Mauli on Kartiki Ekadashi.

Web Summary : Lakhs thronged Alandi for Kartiki Ekadashi, witnessing the sacred bath and adorned form of Sant Dnyaneshwar Maharaj's Samadhi. The Bere couple received the honor of performing the Mahapuja, expressing gratitude for Mauli's blessings and praying for everyone's well-being.
टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरekadashiएकादशीSocialसामाजिकTempleमंदिरPandharpurपंढरपूर