Lagir zal ji serial actor come together for this cause | मालिका संपल्यावरही आज्या, राहुल्या, जयडी आणि भैय्यासाहेब एकत्र आले आणि... 

मालिका संपल्यावरही आज्या, राहुल्या, जयडी आणि भैय्यासाहेब एकत्र आले आणि... 

पुणे : कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाल्यावर आपलेही समाजाच्या प्रति देणे असते हेच लक्षात घेऊन नुकत्याच समाप्त झालेल्या लागीरं झालं जी मालिकेतल्या कलाकारांनी अनाथ आश्रमात नितीश चव्हाण यांचा वाढदिवस साजरा केला. नितीश यांनी या मालिकेत अजिंक्य (आज्या) ही भूमिका साकारली होती. त्यांनी पुण्याजवळील मांजरी येथील सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात वाढदिवस साजरा केला. 

त्यावेळी त्यांच्यासोबत  निखील चव्हाण (मालिकेतील नाव विक्या),महेश जाधव (मालिकेती नाव टॅलेंट),राहुल मगदुम (मालिकेतील नाव राहुल) किरण गायकवाड (मालिकेतील नाव भैय्यासाहेब), पुर्वा शिंदे(मालिकेतील नाव जयडी) आदी कलाकार उपस्थित होते.यावेळी नितीश चव्हाण म्हणाले की, ' मालिकेचे शुटींग असल्याने अनाथ आश्रमात भेट देण्यासाठी वेळ मिळत नव्हता. सध्या मालिका समाप्त झाली आहे त्यामुळे समाजसेवेचा एक भाग म्हणून माझा वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा करण्याचे ठरवले. आम्हाला बघून मुलांना झालेला आनंद माझ्यासाठी लाखमोलाचा आहे'. लागीर झांल जी टीमच्या व मित्र परिवाराच्यावतीने सपकाळ यांच्याकडे एकावन्न हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lagir zal ji serial actor come together for this cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.