सात तासांत रिपोर्ट आणि लाखांहून अधिक कोविड चाचण्या करणारी पुण्यातील प्रयोगशाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 14:25 IST
आतापर्यंत एक लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून रुग्णांसाठी ही प्रयोगशाळा जीवनदायी ठरत आहे.
सात तासांत रिपोर्ट आणि लाखांहून अधिक कोविड चाचण्या करणारी पुण्यातील प्रयोगशाळा
ठळक मुद्देप्रयोगशाळेमध्ये 'आरटी-पीसीआर' चाचणीची तातडीने तयारी करून मान्यतापुणे ग्रामीण, सातारा, कोल्हापुर, अहमदनगर या जिल्ह्यांतूनही नमुने येण्यास सुरूवातजवळपास सात महिन्यांत एक लाखांहून अधिक अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या
पुणे : कोविड चाचणी केल्यानंतर साधारणपणे चोवीस तासांनी त्याचा रिपोर्ट मिळतो. पण ससून रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये स्त्रावाचा नमुना आल्यानंतर 'आरटी-पीसीआर' चाचणीचा रिपोर्ट आता केवळ सात तासातच मिळत आहे. एवढ्या कमी कालावधीत रिपोर्ट मिळाल्याने रुग्णांना लवकर योग्य उपचार मिळणे शक्य होत आहे. आतापर्यंत एक लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून ससूनमधील रुग्णांसाठी तर ही प्रयोगशाळा जीवनदायी ठरत आहे.
शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर चाचणीसाठी केवळ राष्ट्रीय विषाणु संस्थे (एनआयव्ही) शिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण ससून रुग्णालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये 'आरटी-पीसीआर' चाचणीची तातडीने तयारी करून मान्यताही घेण्यात आली. दि. २२ मार्चपासून या प्रयोगशाळेत चाचण्याही सुरू झाल्या.
ससून रुग्णालयातील रुग्णांसह पुणे ग्रामीण, सातारा, कोल्हापुर, अहमदनगर या जिल्ह्यांतूनही नमुने येण्यास सुरूवात झाली. महिनाभरातच रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रयोगशाळेचे काम २४ तास तीन सत्रांमध्ये सुरू ठेवण्यात येऊ लागले. त्यामुळे मागील जवळपास सात महिन्यांत एक लाखांहून अधिक अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे १० हजार अँटिजेन चाचण्या आहेत. पण या चाचण्यांचा रिपोर्ट आता केवळ सात तासांतच मिळत आहे. चोवीस तासांत १५८१ चाचण्यांचा विक्रम प्रयोगशाळेने केला आहे.---------चाचणी करताना नमुन्यातील विषाणुचा 'आरएनए' विलग करावा लागतो. सुरूवातीला एका तंत्रज्ञाला एका नमुन्यासाठी किमान ३० मिनिटे लागायची. तसेच स्वॅब कलेक्शन सेंटरमधूनही वेळेत नमुने मिळत नव्हते. त्यामुळे चाचणीचा रिपोर्ट मिळण्यासाठी खुप कालावधी लागायचा. जुलै महिन्यात 'आरएनए' विलग करणारी मशिन प्रयोगशाळेत आली. त्यानंतर सर्व नमुने किमान दुपारी दोन वाजेपर्यंत प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सुचन्या दिल्या गेल्या. त्यामुळे रिपोर्ट तयार होईपर्यंतचा कालावधी हळू-हळू कमी होत गेला. ऑक्टोबरमध्ये हा कालावधी सात तासांपर्यंत कमी झाला आहे. याचा फायदा रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी होत आहे. ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी ही प्रयोगशाळा खुप महत्वाची ठरत आहे.- डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता व विभागप्रमुख सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय------------रुग्णालयात झालेल्या चाचण्यापुणे - ९९,९५९सातारा- ६,७८९कोल्हापूर - ३३१नाशिक - ८४मालेगाव - ११९एकुण - १,०७,२८१---------------------नमुना प्रयोगशाळेत आल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंतचा कालावधीदिवस चाचण्या कालावधी (तास)२० ते २६ ऑगस्ट ८३८९ १९२७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २९४७ १२३ ते ९ सप्टेंबर ५३९४ १३१० ते १६ सप्टेंबर ६९३३ १७१७ ते २३ सप्टेंबर ५९५२ ११२४ ते ३० सप्टेंबर ६०३३ ८१ ते १० ऑक्टोबर ४२०१ ७-------------------------------------------