शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या पाण्यात वाहून गेले श्रम अन् स्वप्ने; भोसरी एमआयडीसीतील उद्योजक हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:59 IST

 भोसरी एमआयडीसीतील उद्योजकांचा हताश आक्रोश, उपाययोजनांबाबत महापालिका, एमआयडीसीची डोळेझाक होत असल्याचा उद्योजकांचा आरोप

- गोविंद बर्गे पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉक परिसर गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या कहराखाली आहे. आकाशातून बरसणाऱ्या पाण्यासोबत अनेक उद्योजकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. यंत्रसामग्री पाण्यात बुडाली, उत्पादन थांबले, कोट्यवधींचा माल पाण्यात गेला. पण, या सर्वांत अधिक दुःखद गोष्ट म्हणजे, वर्षानुवर्षांची मेहनत आणि स्वप्नं क्षणार्धात वाहून गेली.

भोसरी एमआयडीसी परिसराला नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला. पावसाचे पाणी शिरल्याने अनेक छोट्या - मोठ्या कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पावसाच्या पाण्याने कंपनीतील उत्पादित माल खराब झाला असून, यंत्रसामग्रीही जलमय झाली. परिणामी उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली. उद्योजकांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. भोसरी एमआयडीसी टी ब्लॉकमध्ये मुसळधार पावसाने अनेक कंपन्यांमध्ये रस्त्यावरून वाहात येणारे पाणी घुसले. त्यामुळे उत्पादित मालाचे मोठे नुकसान झाले. शॉर्टसर्किटचा धोका निर्माण झाल्याने कामकाज थांबवावे लागले. अनेक ठिकाणी तीन ते चार फूट पाणी साचल्यामुळे यंत्रसामग्रीही बंद पडली.हे चित्र दरवर्षीचे झाले आहे. अनेक वर्षांपासून उद्योजक या समस्येवर उपाययोजनांची मागणी करीत आहेत. मात्र, महापालिका आणि एमआयडीसी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून, कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. आम्ही लाखो रुपयांचा कर वेळेवर भरतो. मात्र, पावसाळी पाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. पावसाच्या पाण्याने आमचे मोठे नुकसान झाले. काही कंपन्यांनी प्रशासनाची वाट न बघता विद्युत मोटारी लावून कंपनीतील पाणी बाहेर काढले. येथील उद्योजकांमध्ये प्रशासकीय अनास्थेबद्दल तीव्र नाराजी आहे. 

महावीर रबर इंडस्ट्रीजमध्ये पाण्याचा लोंढा मोठ्या प्रमाणात शिरल्याने कंपनीची भिंत कोसळली. रस्त्यावरील कचरा आणि मातीही वाहून आली. पाण्याचा निचरा व कचरा साफ करण्यासाठी चार दिवस लागले. या कालावधीत कंपनीतील कामकाज बंद ठेवावे लागले. त्यामुळे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. -नयन भंडारी ,महावीर रबर इंडस्ट्रीज, टी ब्लॉक भोसरी एमआयडीसी 

ग्रँटॅक इंडस्ट्रीजसह शेजारील चार कंपन्यांसमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी साठते. अर्धा तास मुसळधार पाऊस पडल्यास रस्त्यावर तळे तयार होऊन हे पाणी थेट कंपन्यांमध्ये शिरते. येथील रस्त्याचे काम झाल्यानंतर रस्ता थोडा उंच झाला. तसेच भूमिगत सांडपाणी वाहिनी अर्धवट ठेवल्याने हे पाणी कंपन्यांमध्ये शिरून सतत नुकसान होते. गेल्या महिनाभरात ७ ते ८ वेळा ही परिस्थिती उद्भवली होती. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी महापालिका आणि एमआयडीसीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.  -कृष्णा वाळके, मालक, ग्रँटॅक इंडस्ट्रीज, भोसरी एमआयडीसी टी ब्लॉक. या परिसरात पावसाळापूर्व नालेसफाईची कामे केली होती. स्थापत्य विभागाला सूचना देऊन सध्या निर्माण झालेली समस्या तातडीने दूर केली जाईल. - पजा दुधनाळे, क्षेत्रीय अधिकारी, ह प्रभाग. एमआयडीसी भागातील उद्योजकांच्या समस्यांबाबत महापालिका आणि एमआयडीसीचे सातत्याने दुर्लक्ष होते. तक्रारी केल्यास एकमेकांकडे बोट दाखविले जाते. अधिकाऱ्यांनी केवळ बैठकांचे सोपस्कार पूर्ण करण्यापेक्षा या भागात पाहणी दौरा करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. - अभय भोर, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwater shortageपाणीकपातWaterपाणीRainपाऊस