कुसेगावला विवाहितेची तीन मुलींसह आत्महत्या

By Admin | Updated: January 31, 2015 22:46 IST2015-01-31T22:46:13+5:302015-01-31T22:46:13+5:30

कुसेगाव (ता. दौंड) परिसरातील भोसलेवाडी येथे एका महिलेने आपल्या तीन मुलींसह आत्महत्या केली आहे़ ही घटना शनिवार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली़

Kusiggaon Married with three girls suicidal | कुसेगावला विवाहितेची तीन मुलींसह आत्महत्या

कुसेगावला विवाहितेची तीन मुलींसह आत्महत्या

पाटस : कुसेगाव (ता. दौंड) परिसरातील भोसलेवाडी येथे एका महिलेने आपल्या तीन मुलींसह आत्महत्या केली आहे़ ही घटना शनिवार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली़
वैशाली उमेश मोकाशी (वय. २४, रा. भिवडी, ता. पुरंदर),
मल्लिका मोकाशी (वय २ वर्ष)
आणि दोन महिन्यांच्या दोन जुळ्या मुली अशी मृत्यु पावलेल्यांची आहेत. आत्महत्तेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
वैशाली मोकाशी या बाळंतपणासाठी माहेरी आल्या होत्या़ गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला होता. आज सकाळीच त्या घरातून अचानक निघून गेल्या. दोन वर्षाच्या मुलीला घेऊन जातांना त्यांना एका माणसाने
पाहिले होते.
दरम्यान माहेरकडील मंडळी
एका कार्यक्रमानिमित्ताने बाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून
वैशालीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
वैशाली आपल्या लहान मुलीला घेऊन बाहेर गेल्याचे एका माणसाने
पाहिल्या नंतर या
माणसाने तिचा शोध घेतला तेव्हा
तिने मुलीसह एका शेतातील
विहीरीत आत्महत्या केली असल्याचे दिसून आले.
तर दुसरीकडे घरातील
न्हाणीत एका पाण्याने भरलेल्या पातेल्यात दोन जुळ्या मुलींचा
मृतदेह आढळून आला. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पाटसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहे.
(वार्ताहर)

४यवत येथील ग्रामीण रुग्णालयात व्यक्तींचे शवविच्छेदन केले असता या चौघींचाही पाण्यात बुडून मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री उशीराने वैशालीच्या सासरी (भिवडी. ता. पुरंदर) येथे अंत्ययात्रा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Kusiggaon Married with three girls suicidal