शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

कृषी विकास प्रतिष्ठानची 'लॅब' विज्ञान क्षेत्रात नवी पिढी तयार करण्यास उपयुक्त : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 19:14 IST

- कृषी विकास प्रतिष्ठानच्या सायन्स पार्कमध्ये राजीव गांधी सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी कमिशनच्या वतीने 'तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रयोगशाळा' व 'विज्ञान आणि नवं संशोधन केंद्रा'चे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

बारामती : बारामती येथे कृषी विकास प्रतिष्ठानने उभारलेली लॅब विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवी पिढी तयार करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आज हा नवीन प्रकल्प हातामध्ये घेतला आहे. त्यामुळे अधिक गुणवत्ता आणि दर्जा वाढेल. भावी पिढी आत्मविश्वासाने भारलेली अशी तयार होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. कृषी विकास प्रतिष्ठानच्या सायन्स पार्कमध्ये राजीव गांधी सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी कमिशनच्या वतीने 'तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रयोगशाळा' व 'विज्ञान आणि नवं संशोधन केंद्रा'चे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागात आधुनिक विज्ञानाची ओळख करून देणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे हे सेंटर राज्यासाठी पथदर्शी ठरेल, याबाबत तीळमात्र शंका नाही. राज्यातील १००० शिक्षकांना हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. भविष्यातील काळ ‘एआय’चा असेल. राज्य सरकार याबाबत नवीन धोरण आखत आहे. नव्या पिढीला रोजगार संधी देण्यासाठी मुंबईत २५० एकरांवर ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्यात येत आहे. भारतीय मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज भासू नये यासाठी राज्य सरकारने पाच परदेशी विद्यापीठांबरोबर करार करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर म्हणाले, आजच्या कार्यक्रमात विद्यार्थी यांनी पेटंटचा पाऊस पाडला. एवढ्या मोठ्या संख्येने पेटंटचा पाऊस पडणारा कार्यक्रम यापूर्वी पाहिलेला नाही. अशी शिक्षण क्रांती देशात झाल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नसल्याचे काकोडकर म्हणाले. विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार म्हणाले, आज सुरू केलेला प्रकल्प राज्यातील इतर प्रकल्पांसाठी पथदर्शी ठरणार आहे. परदेशाप्रमाणे आधुनिक सुविधा ग्रामीण भागात देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या प्रकल्पामुळे भविष्यात संशोधक उद्योजक घडविण्यास मदत होइल, असे चेअरमन राजेंद्र पवार म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे सीइओ गजानन पाटील, संस्थेचे सीइओ नीलेश नलवडे, डाॅ. रजनी इंदुलकर, नरेंद्र शहा, नरेंद्र देशमुख, उमेश रस्तोगी, आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड