कोयता गँगची दहशत, रुपीनगर हादरले; अज्ञाताकडून रात्रीच्या सुमारास गाड्यां, दुकानाची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 02:33 IST2023-07-09T02:32:19+5:302023-07-09T02:33:40+5:30
ही घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.

कोयता गँगची दहशत, रुपीनगर हादरले; अज्ञाताकडून रात्रीच्या सुमारास गाड्यां, दुकानाची तोडफोड
निगडी - रुपीनगर मेन रोड जुना बस स्टॉप परिसरातील दुचाकी, चारचाकी गाड्यांची, तसेच दुकानाची सहा ते सात अज्ञात तरुणांनी तोडफोड केली. ही घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.
गाड्यांच्या तोडफोडीचा आवाज आल्याने नागरिकांनी घटना स्थळी गर्दी केली. गाड्यांची तोडफोड कोयते, दांडके, दगड आदीच्या साहाय्याने केली आहे. यामध्ये एक दुकान व्यावसायिक कोयत्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती वाऱ्या सारखी पसरल्याने रुपीनगर परिसरात एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.