कोथरूडमध्ये भाजीपाला चोरल्याचा आरोप करून दोघांना टोळक्याची बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:15 AM2022-03-14T11:15:33+5:302022-03-14T11:17:38+5:30

चौघांवर गुन्हा दाखल...

kothrud two were beaten to death by a mob for stealing vegetables | कोथरूडमध्ये भाजीपाला चोरल्याचा आरोप करून दोघांना टोळक्याची बेदम मारहाण

कोथरूडमध्ये भाजीपाला चोरल्याचा आरोप करून दोघांना टोळक्याची बेदम मारहाण

googlenewsNext

पुणे : टेम्पोतून भाजीपाला चोरल्याचा आरोप करून विक्रेता तसेच त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड भागात घडली. सचिन खाटिकमारे (वय २६, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), त्याचा मित्र धनंजय बोंबले अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन खाटिकमारे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खाटीकमारे आणि त्याचा मित्र बोंबले हे शनिवारी (१२ मार्च) दुपारी दीडच्या सुमारास कोथरूड भागातील आशिष गार्डन चौकातून निघाले हाेते.

त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या अविनाश कांबळे, रवी बोत्रे, किरण बोत्रे व त्यांच्या साथीदारांनी त्यांना अडविले. कांबळे व बोत्रे याने तू माझ्या टेम्पोतील भाजी का चोरतोस, असे म्हणत तेथे पडलेला सिमेंट ब्लॉक खाटिकमारे यांच्या कानावर मारुन जखमी केले.

बोत्रे याने सिमेंटचा ब्लाॅक डोक्यात मारला. यावेळी फिर्यादीला वाचविण्यासाठी धनंजय बोंबले मध्ये आला असता आरोपींनी त्याला पकडून ठेवले. दरम्यान, मारहाण होत असल्याने नागरिक जमा झाले. तेव्हा आरोपींनी कोयते बाहेर काढून कोणी मध्ये पडला तर जिवंत सोडणार नाही, असे म्हणत दहशत निर्माण करुन त्यानंतर पळून गेले.

Web Title: kothrud two were beaten to death by a mob for stealing vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.