Pune Crime: २ मंत्री असूनही कोथरूड असुरक्षित; पोलिसांची यंत्रणा कुचकामी! घायवळ गँगचा सर्वसामान्यावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:38 IST2025-09-18T12:38:13+5:302025-09-18T12:38:55+5:30

Pune Firing News: २ मिनिटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन असूनही घायवळच्या गुंडांनी गोळीबार केला, आसपास पोलीस नसल्याने ती व्यक्ती स्वतःचा जीव मुठीत धरून पळू लागली

Kothrud is unsafe despite being a minister; Police system ineffective! Ghaywal gang opens fire on common people | Pune Crime: २ मंत्री असूनही कोथरूड असुरक्षित; पोलिसांची यंत्रणा कुचकामी! घायवळ गँगचा सर्वसामान्यावर गोळीबार

Pune Crime: २ मंत्री असूनही कोथरूड असुरक्षित; पोलिसांची यंत्रणा कुचकामी! घायवळ गँगचा सर्वसामान्यावर गोळीबार

Pune Shooting: कोथरूड येथे दोन मंत्री राहत असूनही कोथरूड परिसर अद्याप सुरक्षित झालेला नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कुप्रसिद्ध घायवळ गँगकडून बुधवारी रात्री उशिरा सामान्य नागरिकांवर सर्रास गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून कोथरूड भागात मुठेश्वर मित्र मंडळासमोर मध्यरात्री ही घटना घडली.  प्रकाश धुमाळ (वय ३६) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याहून धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या थोड्याच अंतरावर पोलीस स्टेशन असूनही गुन्हेगारांना कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकारानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, दोन मंत्री कोथरूडमध्ये असतानाही गुन्हेगार बिनधास्तपणे हिंसाचार करत असल्याचा आरोप जनमनातून समोर आला आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या नागरिकला सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टोळीतील मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

एबीपी माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, गाडीला साईड दिली नाही या किरकोळ कारणावरून प्रकाश धुमाळवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या लागल्यानंतर तो तशाच अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. जीव वाचवण्यासाठी ही व्यक्ती एका इमारतीच्या दिशेने धावली. त्या इमारतीत एका पाण्याच्या टाकीवर चढून लपून बसली. या दरम्यान या ठिकाणी राहणाऱ्या सचिन गोपाळघरे नावाच्या व्यक्तीने प्रकाश धुमाळ यांना पाणी दिले, आणि मदत केली. या दरम्यान प्रकाश धुमाळ यांच्या शरिरातून वाहणारं रक्त या इमारतीच्या भोवताली पडलेलं होतं, पायाचे ठसे उमटलेले होते. सध्या प्रकाश धुमाळ या व्यक्तीवर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

Web Title: Kothrud is unsafe despite being a minister; Police system ineffective! Ghaywal gang opens fire on common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.