शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कोलकाता गणेशमूर्ती प्रथमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:08 AM

मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची कारागिरांची लगबग

अकोले : अवघ्या थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल गणेशभक्तांना लागली आहे; पण यावर्षी नेहमीपेक्षा वेगळ्या रंगात, ढंगात आणि आकारात कोलकता मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दरवर्षी शाडू मातीच्या किंवा प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या साहाय्याने बनवलेल्या गणेशमूर्ती महाराष्ट्रात विक्रीसाठी उपलब्ध असतात; पण यावर्षी इंदापूर तालुक्यात बारामती रोडवर पिंपळे येथे कोलकता मातीच्या बनवलेल्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी तयार आहेत.या मूर्तींचे खास वैशिष्ट्य म्हणजे या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली) असल्याने यामुळे कोणतेही जलप्रदूषण होणार नाही. या मूर्ती तयार करण्यासाठी कोलकता माती, गव्हाचे काड, बांबूचे लाकूड, सुतळी आणि नैसर्गिक रंग आदींच्या साहाय्याने कलाकुसर करून वेगवेगळ्या रुपात गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या गणेशमूर्ती अनेक देवतांच्या रूपात म्हणजेच शंकर, गरुडरुपी पक्ष्यावर बसलेल्या आणि सिंहासनावर स्वार झालेल्या अशा दहा फुटांपर्यंत या गणेशमूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत.याच मूर्ती रस्त्याने येणाऱ्या-जाणाºया लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याच कलाकुसरीसाठी खास चार महिन्यांपासून पश्चिम बंगालवरून आलेले कारागीर तापूस, मुंडोल, सोपून, विक्रम, दिवासिस यांनी गणेशमूर्ती बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.येथील शाडूच्या मूर्तीपेक्षा आम्ही मातीपासून बनवलेल्या मूर्ती टिकाऊ आणि मोठ्या आकाराच्या असल्यामुळे खूप दिवस बनवायला लागले. आम्ही या मूर्ती तयार करण्यासाठी कोणत्याही साचाचा उपयोग करीत नाही. केवळ हाताच्या साहाय्याने सुबक मूर्ती बनवण्याचे काम करीत असल्याने मूर्तींच्या किमती दोनशे रुपयांपासून पाच हजार रुपये असल्याचे कारागिरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावर्षी मात्र, कलकत्ता मातीच्या मूर्ती प्रथमच पुणे जिल्ह्याच्या बाजारात दाखल होणार असून इतर मूर्तींच्या तुलनेत या गणेशमूर्ती नक्कीच गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेणार, यात मात्र शंका नाही.इंदापूरकरांनी दिली कलेला मनापासून दाद४आता केवळ शेवटचा रंगाचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. यावेळी मुंडोल म्हणाले, की आमचा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय कोलकत्यात अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील लोक पर्यटनासाठी आले असता त्यांनी आमची कला पाहून इंदापूर तालुक्यात गणेशमूर्ती बनवण्यासाठी येण्याची विनंती केली यासाठी त्यांनी पूर्ण सहकार्य केले.

टॅग्स :ganpatiगणपतीIndapurइंदापूर