शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जाणता राजा खरंच अवतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:12 IST

संपूर्ण जगात या महानाट्याचे हजारांच्या वर प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रयोग झाले तरी भारतातही अनेक राज्यांत ...

संपूर्ण जगात या महानाट्याचे हजारांच्या वर प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रयोग झाले तरी भारतातही अनेक राज्यांत हिंदी भाषेत जाणता राजा नाटक होत असे. १९८४ ला जाणता राजाचा पहिला प्रयोग झाला होता. बाबासाहेब इंग्लडमध्ये गेल्यावर त्याठिकाणी पाहिलेले मोठमोठे पुतळे, प्रतिमा यावरून नाट्यप्रयोगाची कल्पना सुचली. ते अमलात आणण्यासाठी एक कुशल संघटक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.

जाणता राजा या महानाट्यात सर्वांना प्रवेश दिला जात असे. त्यांनी या महानाट्यासाठी सात ते आठ जणांचे एक कुटुंब तयार केले. कलाकारांकडून कधी चुका झाल्या तर चारचौघांत ओरडले नाहीत. पण जाणूनबुजून केलेल्या चुकीला त्यांनी कधीच माफ केले नाही, अशी शिस्तबद्ध शिकवण त्यांच्याकडून अनुभवायला मिळत असल्याचे कलाकार म्हणतात.

नाटकाच्या निमित्ताने महाराष्ट्रतील अनेक जिल्हयात फिरायला मिळत असे. देशातील बऱ्याच राज्यात जाण्याची संधीही कधी हुकवली नाही. नागपूर मधील रामटेक, कोल्हापूर मधील पन्हाळगड, पुरंदर, राजगड, शिवनेरी असे किल्ले, तसेच पर्यटन स्थळेही पाहायला मिळत होती. इतिहास - भूगोलाचा अभ्यास नाटकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी करून दिला.

जगण्याची पद्धत, कुटुंबाची शिस्तप्रियता याची सवयही बाबासाहेबांनी लावून दिली होती.

मावळे, अष्टप्रधान मंडळी, महाराज, मोघल, सहकारी, वासुदेव, गोंधळी, शेतकरी अशा लहानांपासून मोठ्या व्यक्तिरेखांचा अभ्यास त्यांनी केला होता. म्हणूनच नाटकातील लहानशी चूक त्यांच्या पटकन लक्षात येत असे. ती वेशभूषेच्या बाबतीत असो वा अभिनय, नैपथ्य यासंदर्भात असो. प्रयोगात कुठल्याही पात्राची कमतरता भासल्यास बाबासाहेब स्वतः ते पात्र साकारत असत.

रमणबाग शाळेतील एका प्रयोगात वासुदेव हे पात्र करणारा व्यक्ती येऊ शकला नाही. त्याच क्षणी बाबासाहेबांनी कुठलाही विचार न करता तातडीने वासुदेवाचा अंगरखा चढवला. डोक्याला मोरपीस लावून ते रंगमंचावर आले.

शाहिस्तेखानाच्या कव्वालीच्या प्रसंगात कव्वाली करणाऱ्याची वेशभूषा चुकली होती. पण ती लोकांच्या निदर्शनास आली नाही. बाबासाहेब त्यावेळी रंगमंचाच्या समोर बसले होते. त्यांना मात्र ही गोष्ट लक्षात आली. प्रसंग संपताच बाबासाहेब रंगमंचाच्या खालून स्टेजच्या मागे गेले. कव्वाली करणाऱ्या कलाकाराला त्याची चूक दाखवली.

पू ल देशपांडे एकदा नाटक पाहायला आले होते. पण त्यांना नाटक पूर्ण पाहता आले नाही. याबद्दल पुलंनी बाबासाहेबांची माफी मागितली. पुलम्हणाले, नाटकातले प्रसंग इतके खरेखुरे वाटत होते. की माझ्या डोळ्यात सातत्याने अश्रू येत होते. त्यामुळे मला अश्रूंमुळे धूसर दिसू लागले आणि मी नाटक पूर्ण पाहू शकलो नाही. इतके खरेखुरे महाराज आणि त्यांचे स्वराज्य माझ्यासमोर नाटकातून अवतरले होते. कार्यशाळेत बाराबंदी - फेटा बांधण्याबरोबरच पगडी कशी घालावी हेही बाबासाहेबांनी शिकवले. तर धोतर नेसण्याची खरी पद्धत त्यांनीच आम्हाला शिकवली.

मावळ्यांनी मुजरा कसा करावा यापासून छत्रपतींच्या अभिनयापर्यंत सगळीकडे बाबासाहेब लक्ष देत असे. देशभरातून ७ ते ८ हजार लोकांना एकत्र आणून बाबासाहेबांनी जाणता राजा महानाट्य बसवले आहे.

- अतुल चिंचली