स्नॅपडीलवरून मागवला चाकू, ऑनलाइन मागवलेल्या चाकूच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 14:05 IST2021-04-18T14:04:55+5:302021-04-18T14:05:42+5:30
बॉयकडून १ हजार ९५० रुपयांचा माल जबरदस्तीने घेतला काढून

स्नॅपडीलवरून मागवला चाकू, ऑनलाइन मागवलेल्या चाकूच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले
पिंपरी: अज्ञात व्यक्तीने स्नॅपडीलवरून ऑनलाइनच्या माध्यमातून चाकू मागवला. त्याचाच धाक दाखवून डिलिव्हरी बॉयकडून एक हजार ९५० रुपयांचा माल जबरदस्तीने घेतला काढून घेतल्याचा प्रकार पिंपरीत घडला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मुकाई चौक येथे शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
विनोद लकुमन ललवाणी (वय ४३, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुणाल सुभाषचंद्र वाल्मीकी (वय २१, रा. देहूरोड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल याने स्नॅपडीलवरून ऑनलाईन माध्यमातून चाकू मागवला. ते पार्सल घेऊन ललवाणी मुकाई चौकात आले. त्यावेळी कुणाल तेथे रिक्षातून आला. त्याच्याकडून पार्सल घेऊन ते उघडले. पार्सलमधील चाकू काढून त्याचा धाक दाखवून शिवीगाळ करून ललवाणी यांच्याकडून १ हजार ९५० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेला.