पाणीपुरीचे पैसे मागितल्याने दोघा गुंडांचा चाकू हल्ला; शनिवारवाडा परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 10:09 IST2023-01-31T10:08:09+5:302023-01-31T10:09:08+5:30

हा प्रकार शनिवारवाड्यासमोरील पाणीपुरी स्टॉलवर शनिवारी रात्री घडला...

Knife attack by two gangsters for demanding money for Panipuri; Incidents in Shaniwarwada area | पाणीपुरीचे पैसे मागितल्याने दोघा गुंडांचा चाकू हल्ला; शनिवारवाडा परिसरातील घटना

पाणीपुरीचे पैसे मागितल्याने दोघा गुंडांचा चाकू हल्ला; शनिवारवाडा परिसरातील घटना

पुणे : पाणीपुरी खाल्ल्यानंतर पैसे मागितल्याने दोघा गुंडांनी पाणीपुरी चालकावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारवाड्यासमोरील पाणीपुरी स्टॉलवर शनिवारी रात्री घडला.

याप्रकरणी राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचा शिवाजी रोडवर शनिवारवाड्यासमोर पाणीपुरीचा स्टॉल आहे. शनिवारी रात्री रिक्षातून दोघेजण अचानक आले. त्यांनी फिर्यादी यांना पाणीपुरी खिला, तू अपने भाई को बुला असे म्हणाले. फिर्यादी यांनी त्यांना पाणीपुरी खाण्यास दिली.

त्यानंतर फिर्यादी यांनी त्यास पाणीपुरीचे पैसे मागितले असता त्यांचा राग येऊन त्यांनी खिशातून चाकू काढला. फिर्यादी यांच्या कोपऱ्यावर व दंडावर वार करून गंभीर जखमी केले. दुसऱ्याने त्यांना हाताने मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Knife attack by two gangsters for demanding money for Panipuri; Incidents in Shaniwarwada area