किरकोळ कारणावरून पतीने पत्नीवर चाकूने केले सपासप वार; राजगुरुनगर येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 15:19 IST2021-03-09T15:18:31+5:302021-03-09T15:19:32+5:30

पोलिसांनी आरोपीला केली अटक..

knief attack on wife by husband due to normal issue; Incident at Rajgurunagar | किरकोळ कारणावरून पतीने पत्नीवर चाकूने केले सपासप वार; राजगुरुनगर येथील घटना 

किरकोळ कारणावरून पतीने पत्नीवर चाकूने केले सपासप वार; राजगुरुनगर येथील घटना 

राजगुरुनगर: किरकोळ कारणावरून पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना राजगुरुनगर वाडा रोड येथे घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून महिला दिनाच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पती किसन भिमाजी भारमळ (वय ५५ ) यांच्याविरुद्ध पत्नीने खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत खेडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदा किसन भारमळ ( वय ४३ ) व पती किसन भारमळ हे वाडारोड येथील गोळी कारखाना येथे शिव कदम बीबी यांचे चाळीत राहण्यास होते. पत्नी नंदा भारमळ ह्या मोलमजुरी चे काम करतात. पती किसन भारमळ हा संगम गार्डन सोसायटी चे सेक्युरिटी काम करत होता. ( दि. ८ मार्च )रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पती घरी आला होता. दरम्यान पत्नीची नातेवाईक दिपाली भोईटे आली होती. घरात आलेली मुलगी कोण आहे असे पतीने विचारले असता पत्नीने पतीला येथून निघून जाण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून पती किसन यांने चाकूने पत्नी नंदा हिला पोटावर, हनुवटी डाव्या हाताच्या पोटरीवर व कोपरा जवळ, डाव्या पायाचे मांडीवर चाकूने वार करून जखमी केले. व तेथून पळ काढला. या घटनेबाबत पोलिसांनी आरोपी किसन भारमळ याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडी दिली असुन पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल लाड करित आहे.
 

Web Title: knief attack on wife by husband due to normal issue; Incident at Rajgurunagar