किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुकी, सोमय्यांना गंभीर दुखापत; रुग्णालयात दाखल, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 07:32 PM2022-02-05T19:32:00+5:302022-02-05T19:32:57+5:30

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

Kirit Somaiya pushed by Shiv sena supporters Somaiya seriously injured Watch the video | किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुकी, सोमय्यांना गंभीर दुखापत; रुग्णालयात दाखल, पाहा Video

किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुकी, सोमय्यांना गंभीर दुखापत; रुग्णालयात दाखल, पाहा Video

Next

पुणे

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पुणे महापालिका परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले. यात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

किरीट सोमय्या यांना सध्या पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुणे महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळल्याने सोमय्यांच्या माकडहाडाला जबर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. काहीजण कारसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. एका व्यक्तीनं तर सोमय्यांच्या कारची काच फोडण्याचा प्रयत्न केल्याचंही व्हिडिओतून समोर आलं आहे. 

शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महापालिकेच्या आवारात माझ्यावर हल्ला केल्याचं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्या यांच्यावर संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे भाजपा शहराध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरातही तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Web Title: Kirit Somaiya pushed by Shiv sena supporters Somaiya seriously injured Watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.