Pune: मावशीच्या मुलाच्या लग्नाला घेऊन जातो सांगत ६ वर्षीय मुलाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:32 IST2023-06-17T12:31:08+5:302023-06-17T12:32:53+5:30

मावशीच्या लग्नात तुमच्या मुलाला घेऊन जातो असे सांगितले...

Kidnapping of 6-year-old boy saying he was taking him to his aunt's son's wedding | Pune: मावशीच्या मुलाच्या लग्नाला घेऊन जातो सांगत ६ वर्षीय मुलाचे अपहरण

Pune: मावशीच्या मुलाच्या लग्नाला घेऊन जातो सांगत ६ वर्षीय मुलाचे अपहरण

पुणे : मावशीच्या मुलाच्या लग्नात तुमच्या मुलाला गावाला घेऊन जातो असे सांगून शेजारच्याने सहा वर्षांच्या चिमुकल्याला नेले आणि बरेच दिवस उलटून गेले तरी मुलाला घेऊन न परतल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे.

जेनिफर जस्टिन त्रेवीयम (३८, रा. येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जेनिफर यांचे शेजारी अंजली प्रमोद शुक्ला (२१) आणि नितीन प्रमोद शुक्ला (१९) यांनी मावशीच्या लग्नात तुमच्या मुलाला घेऊन जातो असे सांगितले आणि काही दिवस उलटले नाही तरी मुलाला घेऊन परतले नाही म्हणून दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकमेकांचे शेजारी असल्याने जेनिफर यांनी लग्नाला घेऊन जाण्यास होकार दिला. उत्तर प्रदेशात पोहोचले असे सांगण्यासाठी त्यांनी फोनही केला. मात्र अचानक दोघांचाही फोन बंद येऊ लागल्याने जेनिफर यांच्या कुटुंबीयांची धाकधूक वाढली. मुलाच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत येरवडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Kidnapping of 6-year-old boy saying he was taking him to his aunt's son's wedding