Pune: इन्स्टाग्रामवर तलवारीचा स्टेटस ठेवणे पडले महागात! युवकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:06 IST2023-07-26T16:03:49+5:302023-07-26T16:06:39+5:30
शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल...

Pune: इन्स्टाग्रामवर तलवारीचा स्टेटस ठेवणे पडले महागात! युवकावर गुन्हा दाखल
निमोणे (पुणे) : गुनाट (ता. शिरूर) येथील एका तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तलवार असलेला फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे त्याच्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिस स्टेशनकडून दिलेल्या माहितीनुसार गुनाट (ता. शिरूर) येथील वैभव ऊर्फ दत्तात्रय भाऊसाहेब झिटे याचे इन्स्टाग्राम अकाउंटवर तलवार असलेला फोटो स्टेटसला दहशत पसरवण्याच्या दृष्टीने ठेवला आहे. अशी गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांना समजली. त्याबाबत माहिती पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना सांगितल्याने त्यांनी लगेच पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन आरोपीकडून तलवार जप्त केली व गुन्हा दाखल केला आहे.
तसेच यापुढेही कोणी सोशल मीडियाद्वारे दहशत माजविण्याचा कोणी प्रकार केला, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिला आहे.