'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 01:22 PM2021-09-28T13:22:07+5:302021-09-28T16:42:21+5:30

या फ्लेक्समुळे संपूर्ण कात्रज गाव परिसर भागाबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Katraj was killed flakes in pune latest news | 'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ

'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ

Next

कात्रज: कात्रज चौकामध्ये एका खाजगी प्लॉटवर अज्ञात व्यक्तीनी कात्रजचा खून झाल्याचा वीस बाय 50 चा मोठा फ्लेक्स लावला आहे. यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे कात्रज येथील राजकारण तापत आहे अशी चर्चा सुरू आहे. हा फ्लेक्स का लावला कोणी लावला याच्यामागे काय कारणे आहेत, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मात्र या फ्लेक्समुळे संपूर्ण कात्रज गाव परिसर भागाबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

मागील आठवड्यामध्ये कात्रज येथील उड्डाणपूलाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आहे.

पंतप्रधानांचा 'भ्रष्टाचारमुक्त भारत' तर मुख्यमंत्र्यांचा 'भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र- किरीट सोमय्या

मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी येथील उड्डाणपूलाचे उद्घाटन केले होते. कात्रज कोंढवा रोडवरून देखील या भागात मोठे राजकारण सुरू आहे. या फ़्लेक्समुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील भागात उद्भवू शकतो. या भागात विकास कामे सुरू असले की राजकारण होते हा या भागाचा राजकीय इतिहास आहे, त्यामुळेच कात्रज कोंढवा रस्ता असेल किंवा कात्रज तळे असेल विकासापासून वंचित राहिले आहे.

Web Title: Katraj was killed flakes in pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app